पवईचा विघ्नहर्ता विराजमान

“गणपती बाप्पा मोरया”, “आला आला माझा गणराज आला” च्या जयघोषात पवईचा विघ्नहर्त्याचे जल्लोषाने आगमन झाले आहे. पवईतील महात्मा फुले नगर येथे दरवर्षी ‘कर्तव्य बहुउद्देशीय फाऊंडेशन’च्या वतीने पवईचा विघ्नहर्ता विराजमान होत असतो. यंदाही वाजतगाजत बाप्पाचा आगमन सोहळा पार पडला असून नयनरम्य देखाव्यात बाप्पा विराजमान झालेला पाहायला मिळाला.

पवई आय आय टी मार्केट शेजारी दीड किलो  मीटर अंतरावर फुले नगर वस्ती वसलेली असून, या वस्तीत अनेक वर्षापासून पवईचा विघ्नहर्ता विराजमान होत असतो. नवतरुणांचा पुढाकार आणि महिलावर्गाची साथ यामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. १० दिवस बाप्पाची सेवा करत अनेक कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात येतात. अनेक ठिकाणी युवा वर्ग व्यसनांना वाहत जात असल्याचे चित्र असताना तरुण पिढीला प्रोत्साहित करत त्यांच्यात परिवर्तन घडवून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करावे या हेतूने आणि भारतीय संस्कृती अबाधित राहिली पाहिजे यासाठी बाप्पांना विराजमान केले असल्याचे ‘कर्तव्य बहुउद्देशीय फाऊंडेशनचे’ अध्यक्ष अभिजित बाबर यांनी उपस्थित प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!