गणेश विसर्जन २०२३: जेविएलआर, साकीविहार रोड अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद

file photo

गुरुवार २८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी निमित्त मुंबईच्या विविध भागातून विसर्जनासाठी निघणाऱ्या वाहनांच्या सोईसाठी मुंबईतील काही भागात मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पवईतील पवई तलाव विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मूर्तींसाठी देखील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेविएलआर) साकीविहार रोड दिवसभर अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणारअसल्याचे साकीनाका वाहतूक विभागाने सांगितले. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे.

“मरोळ, साकीनाका, चांदिवली, जरीमरी, बैलबाजार, असल्फा, घाटकोपर, आरे रोड, विक्रोळी, भांडूप या भागातून मोठ्या प्रमाणावर गणपती विसर्जनासाठी पवई तलावाच्या मुख्य गणेशघाट तसेच गणेशनगर गणेशघाट येथे येतात. मुंबईमध्ये १३ हजार सार्वजनिक मंडळे असून, जवळपास ७० हजार गणेश मूर्तींचे विविध ठिकाणी विसर्जन केले जाते. यासाठी मुंबईच्या विविध भागासह पवई तलाव भागात पालिकेतर्फे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.

साकीविहार रोडवरून (बाजी पासलकर मार्ग) पवईच्या दिशेने येणाऱ्या इतर वाहतुकीला चांदिवली फार्म रोडमार्गे रामबाग आणि हिरानंदानी मार्गे वळवण्यात आले आहे.

जेविएलआर मार्गावरून प्रवास टाळावा

गणेश विसर्जनासाठी जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड मार्गावरून आणि साकीविहार रोवरून संध्याकाळी ४ नंतर सार्वजनिक मंडळांचे बाप्पा निघत असतात. तसेच विसर्जन आणि गणेश मिरवणूक पाहण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरत असतात त्यामुळे दुपारनंतर या मार्गाचा वापर टाळावा असे आवाहन देखील साकीनाका वाहतूक विभागातर्फे या निमित्ताने करण्यात आले आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!