हिरानंदानी पोलीस निवारा कक्षाचे पोलीस उपायुक्त, आमदारांच्या हस्ते उद्घाटन

हिरानंदानी परिसरात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नागरिकांच्या मागणीवर हिरानंदानी हेरीटेज उद्यानाजवळ बनवण्यात आलेल्या पोलीस निवारा कक्षाचे शुक्रवार, २९ सप्टेंबरला पोलीस उपायुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे आणि चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून हे कक्ष उभे करण्यात आले असून, या परिसरात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जास्तीत जास्त काळ पोलीस येथे उपस्थित असणार आहेत.

यावेळी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे, समाजसेवक संजय तिवारी, प्रिया मोहन, मेल्बीन विक्टर, प्रीती मेहरा  हिरानंदानी समूहाचे महाव्यवस्थापक (प्रशासन, सुरक्षा) रणविजय वर्मा, रोटरी क्लबचे हनुमान त्रिपाठी, दिपक दर्यानानी, पवई हिरानंदानी रहिवाशी संघटनेचे हरीश अय्यर, शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, युवा शाखाप्रमुख शैलेश पवार आणि मोठ्या प्रमाणात रहिवाशी उपस्थित होते.

हिरानंदानी परिसरात विशेषतः क्लिफ अव्हेन्यूवर रोडवर तरुण – तरुणी उपद्रव निर्माण करतात. रात्रीच्या वेळी भरधाव वेगात मोटारसायकली चालवणे, ओरडणे आणि नशा करणे अशा गोष्टी या परिसरात वाढल्या आहेत. त्यामुळे येथे पोलिसांनी गस्त वाढवावी आणि क्लिफ अव्हेन्यू मार्गावर एक बीट चौकी बनवण्यात यावी अशी मागणी हिरानंदानी, पवई परिसरातील रहिवाशी अनेक दिवसांपासून करत होते.

मागणी लावून धरत हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या उच्च अधिकार्‍यांपर्यंत पोहोचवत आमदार लांडे यांचे याकडे लक्ष वेधले होते. याच मागणीचा विचार करत लांडे यांनी पोलीस प्रशासन आणि पालिका उद्यान विभाग यांच्यासह सर्व अनुमत्या मिळवत हेरीटेज उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पोलीस निवारा कक्ष उभे केले आहे.

“या परिसरात उद्याने आहेत, नागरिक विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉकसाठी येतात, पोलिसांच्या उपस्थितीमुळे त्यांना सुरक्षित वाटणार आहे. काही तरुण गैरप्रकार करत हुल्लडबाजी करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच रहिवाशांनी पोलिसांसाठी उपलब्ध केलेले हे पोलीस निवारा कक्ष आहे. गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी येथे थांबण्यासोबतच, या परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याची आम्हाला मदत होणार आहे.” असे यावेळी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.

हे कक्ष बीट चौकी नसल्याने येथे संपर्कासाठी कोणताही विशेष नंबर नसणार आहे. मुख्य नियंत्रण कक्ष आणि पवई पोलीस ठाण्यात या परिसरातून प्राप्त तक्रारीवर येथून तत्पर मदत मिळण्यास मदत होणार आहे,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

कसे आहे निवारा कक्ष

हिरानंदानी येथे बनवलेले हे निवारा कक्ष दोन विभागात विभागण्यात आले आहे. बाहेरील विभागात गस्तीवरील पोलीस कर्मचारी यांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. आतील कक्षात पोलीस कर्मचारी यांना कपडे बदलण्याची, जेवणाची तसेच बाथरूमची सोय करण्यात आली आहे.

, , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!