डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी घेतले हिरानंदानीच्या महाराजाचे दर्शन

प्रसिद्ध उद्योजन आणि हिरानंदानी समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी बुधवारी हिरानंदानी, पवई परिसरातील हिरानंदानीचा महाराजा आणि इच्छापूर्ती हिरानंदानीचा महाराजा अशा दोन्ही गणपतींचे दर्शन घेत आरती केली.

पवई हिरानंदानी परिसरात पाठीमागील १३ वर्षापासून तेजस्विनी महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षी ते आपले १४ वे वर्ष साजरे करत असून, माजी आमदार आणि वस्त्रोद्योग मंत्री (कॉंग्रेस) नसीम खान यांच्या माध्यमातून इच्छापूर्ती हिरानंदानीचा महाराजा विराजमान होत असतो. या गणपतीचे बुधवारी डॉ निरंजन हिरानंदानी यांनी दर्शन घेत आशिर्वाद घेतले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माधुरी सिंग, समाजसेवक रवी सिंग, माजी नगरसेविका अंजली दराडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच पाठीमागील २ वर्षापासून रिद्धीसिद्धी महिला विकास सेवा संस्थेच्यावतीने हिरानंदानी येथील गोपीनाथ मुंडे मैदानात हिरानंदानीचा महाराजा विराजमान होत आहे. चांदिवली विधानसभा आमदार (शिवसेना) दिलीप लांडे यांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो. या गणपतीचे दर्शन डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी घेत गणरायाची आरती केली. यावेळी त्यांच्या सोबत हिरानंदानी समूहाचे अधिकारी, समाजसेवक संजय तिवारी, शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी, उपशाखाप्रमुख धनेश जाधव, राजेंद्र जाधव आणि संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ निरंजन हिरानंदानी यांच्यासोबत तेजस्विनी महिला संस्थेच्या अध्यक्षा माधुरी सिंग, समाजसेवक रवी सिंग, माजी नगरसेविका अंजली दराडे आणि पदाधिकारी

डॉ निरंजन हिरानंदानी यांच्यासोबत समाजसेवक संजय तिवारी, शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी, उपशाखाप्रमुख धनेश जाधव, राजेंद्र जाधव आणि संस्थेचे पदाधिकारी

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!
%d