गणेश चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान चांदिवली, खैरानी रोड भागात विजेचा झटका लागून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर ६ वर्षाच्या मुलासोबत पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात साकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास करत आहेत, असे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. साकीनाका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १०.४५ […]








