दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतींचे गुरुवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले.

मुंबई – पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. परंतु पाठीमागील २ वर्ष कोरोनाच्या संकटामुळे अगदी साध्या पद्दतीने अनेक उत्सव साजरे होत होते. गणेशोत्सव ही त्यापैकी एक होता. मात्र आता कोरोनाशी संबंधित सगळेच निर्बंध हटल्याने गणेशभक्तांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असून, यावर्षी पुन्हा मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे.

बुधवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे घरांमध्ये, सोसायटीत, सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे आगमन झाले. काही घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांनी दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर गुरुवारी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. पवईमध्ये मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट अशा दोन ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. सोबत विविध परिसरात कृत्रिम तलाव सुद्धा निर्माण करण्यात आले होते. दोन्ही विसर्जन घाटासह कृत्रिम तलावात रात्री उशीरापर्यंत अनेक छोट्या मोठ्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

संध्याकाळी ४ वाजल्यापासूनच पवईमधील अनेक रस्त्यांवर हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून बाप्पा निरोपाला निघालेले होते. पवई आणि साकिनाका पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली होती.

रिद्धीसिद्धी आणि बुद्धीचा देवता बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करतो, मात्र त्याला निरोप देताना अंतकरण जड होते, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!