जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४
पवई पोलिसांनी मोटार सायकल चोराला ठोकल्या बेड्या
पवई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. संकेत रामचंद्र गोरे (वय २० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, मुंबईत अजून कोठे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. फिर्यादी नामे अतिन […]
पवई येथे अपघातात दोघांचा मृत्यू
रविवारी पवई येथे एका वेगवान टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घाईघाईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी आणि संबंधित मोटार वाहन कायद्याअंतर्गत पवई पोलिसांनी टेम्पो चालक भुरीलाल पालीवाल (३७) याला अटक केली आहे. मृत राजू जैन (३२) आणि त्यांचे नातेवाईक गणेशलाल जैन (६६) हे कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधीसाठी […]
विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]
पवईकर लिखित ‘कम लेट्स शेक हॅन्डस विथ लाईफ’ पुस्तकाचे प्रकाशन
पवईकर शोनिमा कुमार लिखित ‘कम लेट्स शेक हॅन्डस विथ लाईफ’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पवईमध्ये पार पडले. मराठी आणि हिंदी मालिका कथा लेखिका सुषमा बक्षी आणि पवई इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शरली उदयकुमार यांच्या हस्ते पवई इंग्लिश हायस्कूलच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले ते कुमार यांच्या दोन्ही परिवारातील (माहेर-सासर) अगदी लहान […]
पवईत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या छापेमारीत ड्रग्जसह एकाला अटक
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी (५ ऑक्टोबरला) रात्री पवई परिसरात छापा टाकत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. अंचित कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. शनिवार, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता. क्रुझवर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी एनसीबीने रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा […]
पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात पवईकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पवई तलाव वाचवा मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली असून, पवई तलावातून आणि सभोवतालच्या परिसरातून जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या विरोधात पवईकरांच्या एका गटाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तलावाच्या आतील भागातून सायकल ट्रॅकच्या बांधकामावर त्यांनी धक्का व्यक्त करताना हा प्रकल्प किती हानिकारक आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पवईकर […]
पवई तलावाचे सौंदर्य संपवून सायकल ट्रॅक नको; पवई तलावातून सायकल ट्रॅक बांधकामाला निसर्गप्रेमींचा विरोध
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सायकल ट्रॅक बनवण्यासाठी पवई तलावात दगड आणि गाळ टाकणे पुन्हा सुरू करताच शनिवारी अनेक निसर्गप्रेमींनी शनिवारी गांधीगिरीच्या मार्गाने तर रविवारी परिसरातील प्रस्तावित सायकल ट्रॅकच्या विरोधात पवई तलावाजवळ जमा होत विरोध प्रदर्शन केले. यावेळी पवईकरांसह मुंबईच्या विविध भागातील रहिवाशांनीही सायकल ट्रॅकचे पुढील बांधकाम थांबवण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन करण्यासाठी निदर्शनात भाग घेतला. ‘पवई तलाव वाचवा’, […]
विद्यार्थांच्या फी भरणासाठी रिपाइंकडून पवई इंग्लिश शाळेला ५ लाखांची मदत
कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या आणि आर्थिक घडी बिघडलेल्या अनेक पालकांच्या पुढे आपल्या पाल्यांच्या शाळेच्या फीचा प्रश्न सतावत असतानाच विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार्ड क्रमांक १२२ने मदतीचा हात दिला आहे. रिपाइं वार्ड क्रमांक १२२ तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या शाळेची फी सहजरित्या भरता यावी यासाठी पवई इंग्लिश शाळेला पाच लाख […]
शाब्बास रे वाघा ! पाठलाग करून एकट्याने पकडले दोन मोबाईल चोर
मुंबई पोलिसांच्या कार्यामुळेच मुंबई पोलिसांनी स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय स्थान कमावले आहे. ते तेवढेच खरे सुद्धा असल्याची प्रचिती नुकतीच पवई परिसरात आली. आपले कर्तव्य संपवून परतत असताना दोन मोबाईल चोर चोरी करून पळत असल्याचे दिसताच पवई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पठारे यांनी कसलाच विचार न करता त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या […]
निर्जनस्थळी सोडलेल्या दोन पैकी एक मांजराचे पिल्लू मिळून आले; पवई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
दोन नवजात मांजरीच्या पिल्लांना एका सोसायटीच्या सफाई कर्मचाऱ्यांने क्रूरपणे आणि बेकायदेशीरपणे निर्जनस्थळी सोडले होते, त्यातील एक मांजर पवई परिसरात मिळून आले आहे. प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात रामचंद्र नावाच्या सफाई कर्मचाऱ्या विरोधात याबाबत गुन्हा नोंद केला होता. “आम्हाला आनंद आहे की दोन हरवलेल्या मांजरीच्या पिल्लांपैकी एक पिल्लू आमच्या लेकहोम सोसायटीच्या जवळ असलेल्या […]
वीर सावरकर नगरला नवी उजाळी
पवई रामबाग म्हाडा वसाहत स्थित वीर सावरकर नगर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक सुस्थितीत आणण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी तरुणांनी मिळून सदर स्मारका भोवती गेली अनेक दिवस पसरलेल्या झाडाझुडपांचे जंगल हटवत परिसर स्वच्छ केला. कोरोना टाळेबंदीमुळे मुंबईकर घरात अडकून पडले होते. त्यामुळे कोरोनाशी लढा देताना या लढाईत महत्वाचा भाग असणाऱ्या पालिकेची अनेक कामे […]
पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी […]
पवई तलावात विसर्जनासाठी जाताय सावधान; तलावात मगरीचा वावर
पवई तलावात विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांना पालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. मंगळवारी पवई तलाव भागात मगरीचा वावर आढळून आला. पवई तलावामध्ये असलेल्या मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली […]
मांजरीच्या पिल्लांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
सोसायटीच्या आवारात काळजी घेत असलेल्या दोन आठवड्यांच्या २ मांजरांच्या पिल्लांना बेकायदेशीररित्या बाहेर निर्जनस्थळी सोडल्याबद्दल पवई स्थित, प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी त्यांच्या सोसायटीचा सफाई कर्मचारी रामचंद्र याच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार शर्मा या एक मांजर आणि त्याच्या दोन पिल्लांचे पवईतील लेकहोम कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या आवारात काळजी घेत होत्या. “४ सप्टेंबर रोजी, मी […]
अयान शांकताला पवई तलाव वाचवण्याच्या प्रकल्पासाठी इंटरनॅशनल यंग इको-हिरो पुरस्कार
पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणाऱ्या पवईतील १२ वर्षीय अयान शांकता याच्या पर्यावरणासंबंधित कठीण समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रकल्पासाठी ‘२०२१ इंटरनॅशनल यंग इको-हिरो’च्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अयान याने ‘पवई तलावाचे संवर्धन आणि पुनर्वसन‘ यासाठी ८-१४ वर्ष वयोगटात तिसरे स्थान पटकवले आहे. अयान हा जगभरातील २५ तरुण पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी एक असून ‘अॅक्शन फॉर नेशन’ने त्याला इंटरनॅशनल यंग […]
साकीनाका परिसरात ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार; मारहाण
साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, ३७६, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहितीही समोर येत आहे. पीडित महिलेची परिस्थिती […]
पवईकरांनो सावधान ! हिरानंदानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीची नजर, २५०० लोकांना ई चलन
पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]
डंपर चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलिसांनी अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या
पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे. फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी […]