जाहिरातीसाठी : ८८७९३१००७४, वृत्तसंपादक : ९८१९६१३९७४

PEHS Hindi Diwas 2019 1

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये साजरा झाला ‘हिंदी भाषा दिवस’

@प्रमोद चव्हाण पवईच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक पवई इंग्लिश हायस्कूल (पीईएचएस) तर्फे १३ सप्टेंबरला विद्यार्थ्यांना हिंदीचे महत्त्व सांगण्यासाठी “हिंदी भाषा दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाट्य अभिनेते नितेश पांडे प्रमुख अतिथी होते. सरस्वती वंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळवलेल्या या गाण्याला संगीत शिक्षक अमित खोत आणि स्वाती […]

Continue Reading 0
25-years-of-selfless-service-and-devotion-team-hhh

हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटीच्या निःस्वार्थ सेवेची २५ वर्षे

@अनामिका शर्मा अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर हेल्पिंग हँड्स फॉर ह्युमॅनिटी आणि रामबाग पवई वेल्फेअर सोसायटी आयोजित “पवई झील का राजा” गणेशोत्सवानिमित्त एक भव्य भंडारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रिय बाप्पांचे आशीर्वाद घेण्यासोबतच हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदाचा भंडारा अधिक खास होता कारण या नि:स्वार्थ सेवेने आणि भक्तीने ह्यावर्षी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ट्युशन शिक्षकाला अटक

घरी पोहचल्यावर मुलीने तिच्या आईला घडला प्रसंग सांगितल्यानंतर दोघींनी पवई पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी लैंगिक संबंधाबाबत बोलत अश्लील वागणूक दिल्याप्रकरणी पवई पोलिसांनी गुरुवारी एका ४२ वर्षांच्या ट्युशन शिक्षकाला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ओफेंस (पोक्सो) कायद्यांतर्गत अटक केली आहे. सचिन गुलाब हांडे असे […]

Continue Reading 0
फोटो - वन इंडिया (oneindia.com)

तरुणीचे विवस्त्र व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला राजस्थानमधून अटक

पवई पोलिसांच्या हद्दीतील मरोळ भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीशी प्रेमाचे नाटक करून, व्हिडीओ चॅट दरम्यान तिचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून, ते सोशल माध्यमात टाकण्याची धमकी देवून ते टाळण्यासाठी पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी बारनेर, राजस्थान येथून अटक केली आहे. जतिन कुमार रमेश कुमार सिकरानी (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे. […]

Continue Reading 0
file photo powai lake

मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून पवई तलावात ढकलले

पवई तलावात इसमांना बेकायदेशीर मासेमारी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकावर दोन इसमांनी हल्ला करून त्याला पवई तलावामध्ये ढकलून दिल्याची घटना घडली आहे. शेरबहादूर खान असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सुरक्षा रक्षकाने यासंदर्भात पवई पोलिस ठाणे गाठत दोघांविरूद्ध तक्रार नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असून, गुन्ह्यात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली […]

Continue Reading 0
phishing

‘गुगल पे’च्या माध्यमातून कॉलेज तरुणीची फसवणूक

ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी असलेल्या वेबसाईटवर सामान विक्री करताना गुगल पेच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्यासाठी आपला गुगल पे क्युआर कोड देताच ठगाने तिच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारला आहे. आपल्या खात्यातील पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच तिने याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पवईतील एका कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असलेली तेजस्विनी ही मैत्रीणीसोबत पवईतील बीएसएनएल कॉलनीमध्ये पेईंग […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

मेडिकल सीट मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरला ५.५ लाखाला गंडवले

नाशिकमध्ये खासगी रुग्णालय चालवणाऱ्या ५० वर्षीय डॉक्टरला मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये सिट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन ५.५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याचा तपास पवई पोलिस करत आहेत. आर के सिंग, आनंद आढाव आणि अभिषेक सिंह यांनी आयआयटी-बॉम्बे कॅम्पस जवळ ‘असोसिएट्स कन्सल्टंट’ नावाची कन्सल्टन्सी फर्म चालवत फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आले आहे. एका मराठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवर […]

Continue Reading 0
vruksh tod

वृक्षतोडीच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी – विसंगती, मेट्रो ४ आणि ६ साठी सुधारित प्रस्ताव मागवणार

मेट्रो ४ आणि ६ मार्गिकेसाठी तोडल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या वृक्षांसाठी सुमारे दहा हजार नागरिकांनी इमेलद्वारे एकत्रितपणे आक्षेप नोंदवले. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी (मेट्रो ६) आणि कासारवडवली ते वडाळा (मेट्रो ४) या दोन मेट्रो मार्गिकांमधील १८२१ झाडे हटवण्याकरिता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी व विसंगती आढळून आल्याने ते प्राधिकरणाला […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी बॉम्बेला केंद्र सरकारची सीआयएसएफची सुरक्षेची मागणी, सुरक्षा ऑडिट नियोजित

पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) सुरक्षित केले पाहिजे अशी केंद्र सरकारने मागणी केली आहे. सीआयएसएफ राष्ट्रीय संस्था, विमानतळ, रिफायनरीज आणि शासकीय-संचालित हत्यार कारखाना आणि कंपन्यांना सुरक्षा प्रदान करते. आयआयटी मुंबईकडे सध्या शंभर पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आहेत. यातील काही माजी सैनिक सुद्धा आहेत. आयआयटी मुंबई हे पवई तलाव […]

Continue Reading 0
accident

गणेश विसर्जन घाटाजवळ होमगार्ड अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

पवई येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन अपघातात एका २५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण हा होमगार्ड अधिकारी होता. शनिवारी रात्री कर्तव्यावरुन परतत असताना हा अपघात घडला. पवई पोलिसांनी याबाबत अज्ञात वाहनचालकाविरुध्द निष्काळजीपणे आणि हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन काशिनाथ धुमक यांना शनिवारी मरोळ […]

Continue Reading 0
Eco Friendly Ganeshas

युवा पर्यावरण प्रेमींनी बनवला इको गणेशा, यंग एन्वायरमेंटलिस्ट्स ट्रस्टचा उपक्रम

गणेशोत्सवाची सगळीकडे धूमधाम सुरु आहे. या उत्सवादरम्यान पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणून मिठी नदी आणि पवई लेकच्या मातीपासून शेकडो पर्यावरण प्रेमी तरुणांनी लोकांनी पर्यावरणपूरक गणेशाची निर्मिती केली. यंग एन्वायरमेंटलिस्ट्स प्रोग्राम ट्रस्टने यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात होणारी निसर्गाची हानी टाळण्यासाठी निसर्ग रक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या यंग इन्वायरमेंटच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘इको फ्रेंडली’ गणेशाची कार्यशाळा […]

Continue Reading 0
IMG_3360

दिड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जणेत, ढोल-ताशे आणि बॅंजोच्या निनादासह आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दिड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पाचे मंगळवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. सोमवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दिड दिवस पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी […]

Continue Reading 0
1

माझा बाप्पा

शिंदे परिवाराचा एकदंत, आयआयटी मार्केट पवई शिंदे परिवाराच्या बाप्पाच्या आगमनाचे हे पाचवे वर्ष आहे. ‘श्रीं’ ची मूर्ती शाडूच्या मातीने साकारलेली आहे. श्री दत्त गुरुंच्या अवतारातील बाप्पाची ही सुंदर मूर्ती २१ इंचाची आहे. कागद, पुठ्ठा, छत्री, पेपर, फुले, लाकडी, पानाने सजावट करण्यात आली आहे.                  

Continue Reading 0
powai lake selfie polint1

“माय इंडिया” पवई तलावावर सेल्फी पॉईंट; आमदार निधीतून निर्माण

पवई तलावाचे पर्यटन महत्व लक्षात घेऊन आमदार निधीतून नुकतेच “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्मिती येथे करण्यात आली आहे. स्थानिक आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या निधीतून याची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे रविवारी पवईतील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आमदारासोबत सेल्फी घेत उद्घाटन केले. यावेळी सुट्टीचा दिवस असतानाही आणि भर पावसात मोठ्या प्रमाणात पवईतील […]

Continue Reading 0
Aarey human chain

आरेतील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींची मानवी साखळी

@संजय पाटील मुंबई : आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकत्र येत मानवी साखळी रचली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीने २२३८ झाडे तोडण्याची मंजुरी दिली. आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी झाडांची कत्तल केली जाणार आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी रचली. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात तरुणाई आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत घोषणा दिल्या. आज सकाळी ११ […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!