कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होत असतानाच सर्वांत जास्त संपर्कात असणारे पवईतील भाजीपाला विक्रेते आणि हॉकर्स यांची मनपा ‘एस’ विभागाच्यावतीने बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी कोरोना टेस्ट घेण्यात आली. यावेळी जास्तीतजास्त विक्रेत्यांनी याचा लाभ घेतला.
देशभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंमुळे उद्भवणाऱ्या ‘कोविड-१९’शी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका मोठ्या ताकदीने लढत आहेत. मात्र टाळेबंदी हटल्यानंतर खुले करण्यात आलेल्या ठिकाणी येणारे लोक, मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या आणि इतर राज्यात असणारी कोरोनाची बदलणारी स्थिती पाहता पालिका प्रशासन अजूनही काळजीपूर्वक आणि सक्षमपणे कामाला लागलेली पहायला मिळत आहे.
बुधवारी आयआयटी मार्केट परिसरात महानगरपालिका ‘एस’ विभागांतर्गत पवईतील हॉकर्स, भाजीपाला विक्रेते यांची कोविड-१९ (आरटीपीसीआर) तपासणी करण्यात आली. पालिकेतर्फे फिरते तपासणी केंद्राच्या माध्यमातून मोफत तपासणी यावेळी करण्यात आली. कोविड-१९ तपासणी करण्यात आलेला विक्रेताच मार्केटमध्ये व्यवसाय करू शकतो, त्यामुळे ही तपासणी बंधनकारक असल्याचे यावेळी बोलताना पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “विक्रेते हे विविध लोकांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे त्यांना इतरांकडून आणि इतरांना त्यांच्या माध्यमातून संसर्ग होण्याची शक्यता पाहता पालिकेतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे.
No comments yet.