मुंबईच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या पवई तलावाचे मुख्य आकर्षण म्हणजे यात असणाऱ्या मगरी. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून, अशा आशयाचे बोर्ड सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे लावण्यात आले आहेत. पवई तलाव सौंदर्यकरण प्रकाल्पापूर्वी येथे असणाऱ्या छोट्या छोट्या टेकड्यांवर या मगरींचे नियमित दर्शन घडत असे. मात्र, पाठीमागील काही वर्षात त्यांची ही ठिकाणे हरवल्याने मगरींची दर्शन दुर्लभ झाले आहे.
क्वचित दिसणाऱ्या या मगरींचे दर्शन काही मुंबईकरांना गुरुवारी घडले. पवई तलाव मुख्य विसर्जन घाटाच्या समोरील तलावाच्या पाण्यात ही मगर विहार करताना आढळून आली.
“पाऊस सतत बरसत असल्याने पवई तलावाची पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. पाठीमागील शनिवारी पवई तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे या मगरी उन्हाच्या वेळात तलावात फिरताना आढळतात” असे याबाबत बोलताना येथे मासेमारी करणाऱ्या काही लोकांनी सांगितले.
Crocodile scheduled 1 recep