गरीब गरजू मुलांच्या शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पवईतील दिपस्तंभ प्रतिष्ठानच्यातर्फे रविवारी येथील आदिवासी पाड्यांमध्ये अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी आणि पवई पोलिसांतर्फे या किटचे वाटप आदिवासी पाड्यातील बांधवाना करण्यात आले.
कोरोनाला थोपवण्यासाठी करण्यात आलेल्या लाकडाऊनमुळे सर्वांनाच घरी बसण्याची वेळ आली आहे. अशात बेरोजगारी आणि कामाच्या कमीमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशात दररोजच्या कामाच्या बळावर जीवन चालवणाऱ्या आदिवासी पाड्यातील नागरिकांना तर उपासमारीची वेळ येवून ठेपलेली आहे. त्यांची हीच समस्या लक्षात घेत येथील मुलांच्या शिक्षणासाठी गेली २ दशकाहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या दिपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते येथील आदिवाशी पाड्यांमध्ये राहणाऱ्या विविध पाड्यातील नागरिकांना हे अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. संस्थेतर्फे पाठीमागील दीड वर्षात येथील नागरिकांसाठी वेळोवेळी अशा प्रकारे धान्यवाटप केले जात आहे.
No comments yet.