एनटीपीसी इमारतीत आग, मोठा अपघात टळला

लवायू विहार जवळ असणाऱ्या एनटीपीसी या रहिवाशी संकुलाच्या ‘डी’ विंगच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी एसीत शोर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या माहिती मिळताच पाच मिनिटाच्या आत घटनास्थळावर दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

पवई उंच इमारतींच्या ठिकाणा व्यतिरिक्त आगीचे ठिकाण म्हणून पण आता ओळख निर्माण करू लागले आहे. येथील उंच उंच इमारतीत गेल्या काही वर्षात सतत आग लागण्याचे प्रकार वाढलेले आहेत. जे पाहता परिसरात एक अग्निशमन केंद्र उभे करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून वाढू लागली आहे.

मंगळवारी पवई तलावा समोर असणाऱ्या एनटीपीसी इमारतीत पुन्हा अशीच आगीची घटना घडली आहे. इमारतीच्या ‘डी’ विंग २०४ मध्ये एनटीपीसी कंपनीचे गेस्टहाउस आहे. दुपारी १२.१५ वाजता येथील इमारतींमध्ये घरकाम करणाऱ्या एका महिलेला रुमच्या एसी जवळून धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच तिने त्वरित सुरक्षारक्षकांना याबाबत माहिती दिली.

काही अग्नी सुरक्षा प्रशिक्षित सुरक्षारक्षकांनी (हिरानंदानी ग्रुपमध्ये कमांडो म्हणून काम केलेले आहे) त्वरित नागरिकांना इमारतींमधून बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले. स्थानिक नागरिक आणि सतर्क नागरिक शिवमठ यांनी अग्निशमन दलाला याबाबत सूचना देताच पाच मिनिटाच्या आत अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले.

“यावेळी अनेक रहिवाशी घरात होते. काही दिवसांपूर्वी लेकहोममध्ये घडलेल्या घटनेसारखा धोका इथे संभवत होता. मात्र सुरक्षारक्षक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अपघात टळला आहे.” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना शिवमठ यांनी सांगितले.

, , , , , , , ,

2 Responses to एनटीपीसी इमारतीत आग, मोठा अपघात टळला

  1. किरण लोखंडे March 4, 2017 at 6:35 pm #

    मी पवई आवर्तन यांचे खूप अभिनंदन करतो की ते वेळो वेळी, पवई आणि चांदीवली मध्ये होणारे, कोणतही । बातमी। सांग तात।

    आणि पवई मध्ये बस डेपो आहे तसेच अग्निशम केंद्र ।।पाहिजे

    • आवर्तन पवई March 12, 2017 at 4:28 pm #

      किरणजी,

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद…

      पवईमध्ये नवीन अग्निशमन केंद्र तयार होण्यासाठी पत्रव्यवहार सुरु झाला आहे. युथ पॉवर संस्थेने याबाबत मागणीपत्र दिले आहे.

      आम्ही स्वतः आणखी काही स्थानिक माध्यमांच्या साहाय्याने याचा पाठपुरावा करत आहोत.

      येत्या काही महिन्यात जागा मिळताच अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!