हिरानंदानी हॉस्पिटल येथील सर्कलला गोपाल चंद्रभान शर्मा यांचे नाव देण्यात आले आहे. स्थानिक आमदार आरिफ नसीम खान, विविध क्षेत्रातील मान्यवर व शर्मा परिवाराचे सदस्य यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी हा नामकरण सोहळा पार पडला.
शर्मा परिवार आणि पवई यांचे एक अतूट नाते आहे. आता पवई म्हणून विकसित झालेल्या अनेक भागाची जमीन पूर्वी चंद्रभान शर्मा यांचा मालकीची होती. अनेक विकासक कामांसाठी यातील काही जमीन त्यांनी भेट म्हणून दिली आहे, तर काही जमीन नाममात्र मोबदल्यात. शर्मा परिवाराची ही नाळ अशीच जपली जावी म्हणून पार्कसाईट, जीएल कंपाऊंड आणि टेक्नोलॉजी स्ट्रीट हे सर्व रस्ते एकत्रित येणाऱ्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील सर्कलला गोपाल चंद्रभान शर्मा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात होती. त्याला सर्वतोपरी मंजुऱ्या मिळून, रविवारी २५ डिसेंबरला या चौकाला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्थानिक आमदार नसीम खान आणि शर्मा परिवारातील जेष्ठ सदस्यांच्या हस्ते या चौकाच्या ‘गोपाल शर्मा’ नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी पद्मश्री गायक हरिहरन, पालिका एस वार्ड प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश कोपरकर, स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा व हरून खान, राजेंद्र सिंघ, हिरानंदानी समूहाचे सुदीप्तो लेहरी, शर्मा परिवारासह विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नसिम खान म्हणाले, “शर्मा परिवाराने पवईला बरेच काही दिले आहे. अशा परिवाराचे नाव या विभागाशी कायम जोडलेले रहावे अशी लोकांची इच्छा होती आणि आज या चौकाच्या रुपात ती पूर्ण झाली आहे.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.