आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मारामारी, चौघांना अटक

मूड इंडिगोसाठी आयआयटी कॅम्पसमध्ये राजस्थानच्या कोटा भागातून आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यामध्ये प्रेमप्रकरणातून हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पवई पोलिसांनी कारवाई करत मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. उत्कर्ष शर्मा (२०), दिवांज चौधरी (२०), जुनेद खान (१९), शुभम पांडेय (१८) अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

२३ डिसेंबर ते २६ डिसेंबर काळात पवईतील आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये मूड इंडिगो फेस्टिवल साजरा केला गेला. या फेस्टीवलसाठी जगभरातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या कॅम्पसमध्ये आले होते. गव्हर्मेंट कॉलेज ऑफ अजमेर, राजस्थान येथील काही विद्यार्थी सुद्धा येथे आले होते. कॅम्पसमध्ये असणाऱ्या आपल्या मित्रांच्या रूमवर ते राहत होते. २५ डिसेंबरला त्यांच्यात प्रेमप्रकरणाला घेवून वाद निर्माण झाला आणि त्यांच्यात मारामारी झाली. पवई पोलिसांना याबाबत माहिती मिळताच मारामारीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक सैद यांनी आवर्तन पवईला सांगितले, “विद्यार्थी कॅम्पसमध्ये मारामारी करत होते, त्यांना पकडून तेथील सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तक्रारी वरून आम्ही त्यांना मारामारीच्या गुन्ह्यात कलम ३४२, १०९, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवि नुसार अटक केली आहे.”

अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “त्यांच्या चौकशीत तक्रारदार आशुतोष बागोरा आणि पांडेय हे त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या सौम्या नामक एकाच मुलीवर प्रेम करत होते. अजमेर येथे त्यांचे यावरून आधी भांडण सुद्धा झाले होते. रविवारी याच मुद्यावरून पुन्हा आयआयटी कॅम्पसमध्ये त्यांच्यात भांडण झाले आणि त्यांनी मारामारी केली. आशुतोषकडे याबाबत चौकशी केली असता अटक विद्यार्थी त्याची रयांगिंग करत होते आणि त्याने याबाबत आयआयटी प्रशासनाला तक्रार केली असल्याचे सांगितले.”

पवई पोलीस आयआयटीच्या रयांगिंग समितीच्या अहवालाची वाट पाहत असून, त्याच्यावरच मुलांवर रयांगिंगची कलमे लावायची की नाही हे स्पष्ट होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी बोलताना सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!