मारूतीच्या विटंबनेवर वाघ गरजला, मूड इंडिगो प्रशासनाने दिला लेखी माफीनामा

यआयटी मुंबईच्या मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये हिंदूचे दैवत मारुतीचे स्टुडेंट एक्टीविटी सेंटरमध्ये काढलेल्या विटंबनात्मक चित्रावर शिवसेनेच्या वाघांनी टाकलेल्या डरकाळीमुळे मूड इंडिगो प्रशासनाने केवळ ते चित्र पांढऱ्या पडद्यामागे न लपवता लेखी स्वरुपात माफीनामा सुद्धा लिहून दिला आहे. यामुळे शिवसेनेच्या वाघांचा दरारा आजही कायम असल्याचे स्पष्ट होते.

डिसेंबर महिना म्हणजे कॉलेजियन्ससाठी फेस्टिवल मूड असतो. या सर्वात सर्व कॉलेज स्टुडेंटच आकर्षण असते ते आयआयटी मुंबईचे टेक फेस्ट आणि मूड इंडिगो. यावेळी अनेकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते.

आयआयटी मुंबईच्या मूड इंडिगोसाठी कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी तरुणाईची ओळख दर्शवणारी पेंटिंग काढण्यात आली आहेत. अशीच एक भलीमोठी पेंटिंग स्टुडेंट एक्टीविटी सेंटरमध्ये बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये अंगात टी-शर्ट व थ्री-फोर्थ, एका पायात बूट, एका पायात चप्पल, गळ्यात टाय, कानात हेडफोन, हातात घड्याळ, दंडावर फोन अडकवलेला आहे. सोबतच पवनचक्या असलेला डोंगर हातात उचललेला दाखवलेला असून, खांद्यावर पेन घेतलेला हिंदू देवता मारुती सदृश्य चित्र काढण्यात आले आहे.

याची माहिती मिळताच पवईच्या शिवसेना शाखा १२२ चे शाखाप्रमुख निलेश साळुंखेसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी तेथे पोहचत प्रशासनाला धारेवर धरून ते चित्र त्वरित हटवण्यास भाग पाडले.

यासंदर्भात आवर्तन पवईशी बोलताना सांगितले, ‘आमचा तरुणांच्या कलागुणांना वाव मिळण्यावर कोणताच आक्षेप नाही. पण थिल्लरपणाच्या नावाखाली हिंदू धर्माचे आणि हिंदू देवदेवतांचा केलेला अवमान शिवसेना कधीच सहन करणार नाही. त्यांना आम्ही शिवसेना पध्दतीनेच उत्तर देवू. आयआयटी मूड इंडिगोमध्ये सुद्धा असाच काही थिल्लरपणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या चित्राला त्वरित मिटवा अन्यथा आम्ही मूड इंडिगो चालू देणार नाही असा सज्जड दम मूड इंडिगो प्रशासनाला देताच त्यांनी पांढरा पडदा टाकून हे चित्र त्वरित हटवले.’

आयआयटी मूड इंडिगो ऑल ओव्हर कॉर्डीनेटर अखिल धूत यांनी ‘आम्ही सदर बाबत माफी मागत असून, आमचा या पेंटिंगद्वारे कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता. असा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी घेवू’ अशा आशयाचा माफीनामा लिहून दिल्यावर शिवसैनिकांनी मूड इंडिगोतून आपला मोर्चा हलवला.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!