आयआयटी, मुंबईची विदयुत कार ‘ओर्का’ फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी सज्ज

Launch of Orca an initiative of IIT Bombay racing-team best Indian formula student car team in the international circuit

Launch of Orca an initiative of IIT Bombay racing-team best Indian formula student car team in the international circuit

फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धेसाठी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम सज्ज झाली असून, विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेल्या ‘ओर्का’ या पाचव्या इलेक्ट्रिक रेसिंग कारचा अनावरण आणि प्रात्यक्षिक सोहळा रविवारी आयआयटीत विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडला. ० ते ३.४७ सेकंदात १०० किमी वेग पकडणाऱ्या या कारच्या साहय्याने आपली छाप नक्की पडेल असा विश्वास आयआयटी मुंबईच्या रेसिंग टिमने दर्शवला आहे.

इंग्लंडमधील सिल्वरस्टोन सर्किटवर पुढील महिन्यात ‘फॉर्म्युला स्टुडंट’ स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. जागतिक स्तरावरील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील ४० पेक्षा जास्त देशातील १०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेणारी आयआयटी मुंबईची रेसिंग टिम यावर्षी आपल्या पाचव्या इलेक्ट्रिक कार ‘ओर्का’सह सज्ज झाली आहे.

२००८ पासून आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून स्पर्धेसाठी रेसिंग कार बनवायला सुरूवात झाली, तर गेल्या चार वर्षापासून विद्युत कार बनवल्या जात आहेत. वर्षानुवर्ष त्यांची कार पुढच्या स्तरावर जात असून, पाठीमागील वर्षाच्या इवो ४ च्या मुकाबल्यात या वर्षी ‘ओर्का’च्या रुपात अधिक प्रभावशाली कार घेऊन आयआयटी मुंबईची रेसिंग टिम मैदानात उतरत आहे.

“९ महिन्यांच्या मेहनती नंतर एक चांगली कार घेऊन आम्ही आलो आहोत. केवळ ३.४७ सेकंदातच ताशी शून्य ते शंभर किलोमीटरचा वेग ही कार घेते. पोर्श, टेल्सा, ऑडीच्या स्पोर्ट्स कारपेक्षा ही वेगवान आमची ही कार आहे. स्टील फ्रेम चेसिस व कार्बन फायबरची बॉडी वापरून ही कार बनवण्यात आली आहे. पाठीमागील वर्षी ५६ व्या नंबरवर आम्ही आलो होतो. मात्र ‘ओर्का’ ही जास्त वेगवान असून, ती या स्पर्धेत आपली छाप नक्की सोडेल, असे आवर्तन पवईशी बोलताना आयआयटी मुंबईच्या रेसिंग टिमने सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!