चांदिवली भागात चालत्या रिक्षाला आग लागून रिक्षा जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, आयआयटी येथील तिरंदाज शाळेसमोर कारच्या एसीत शॉर्ट झाल्याने पार्किंगमध्ये उभी टाटा इंडिगो पेटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. मात्र इंडिगो गाडी पूर्ण जळून खाक झाली असून, तिच्या जवळ पार्क असणाऱ्या कॉलीस आणि मारुती अशा दोन गाड्यांचे सुद्धा जळून नुकसान झाले आहे.
तिरंदाज शाळेसमोरील इमारतीत राहणारे मिहीर हे सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या इंडिगो गाडीने घरी परतले होते. इमारती समोर पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्यांना गाडीच्या एसीमधून धूर निघत असल्याचे जाणवले. काय झाले आहे हे पाहण्यासाठी ते गाडीतून उतरलेच असतील कि, गाडीने आतून अचानक पेट घेतला, अन् बघता बघता संपूर्ण गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली.
कारच्या आगीच्या झळा तिच्यापर्यंत मर्यादित न राहता, तिच्या समोरच पार्क असणाऱ्या कॉलीस गाडीपर्यंत पोहचत तिचा समोरचा भाग आगीच्या भक्षस्थानी आला. तर बाजूलाच पार्क असणाऱ्या मारुती कारचा गर्मीमुळे रंग उडून गेला.
अग्निशमन दलाच्या ३ बंबाणी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवत इतर गाड्यांना आगीच्या कवेत जाण्यापासून वाचवले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.