कोरोना काळात वाढणारी रुग्ण संख्या आणि त्यात सरकारी आदेशानुसार लावण्यात येणारे लॉकडाऊन त्यामुळे बरेच पक्ष आणि संघटनांनी आपले ठरवलेले कार्यक्रम रद्द करून घरीच राहून महापुरुषांच्या जयंती साजरी केली.त्यानंतर जसजसे अनलॉक होत गेले त्यानुसार सर्व संघटना,पक्ष एकत्रित येत महापुरुषांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी संयुक्त जयंती साजरी करत आहेत.
त्याचप्रमाणे पवईतील वंचित बहुजन आघाडी वार्ड १२५ च्या वतीने देखील दि.१३ फेब्रुवारी रोजी माता रमाई, माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांची संयुक्त जयंती पवईत साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
पवईतील महिला वार्ड अध्यक्ष कल्पना घोक्षे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता गायकवाड (मुंबई महिला अध्यक्ष), सुकेशनी खेकडमल (विक्रोळी तालुका अध्यक्ष), विशाल खंडागळे (वार्ड अध्यक्ष १२५) तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमात लहान बालकांनी माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांची वेशभूषा करून त्यांचे विचार जनमानसात रुजविण्याचे काम वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने करण्यात आले.
No comments yet.