पवईस्थित एका ६७ वर्षीय व्यावसायिकाची (businessman) अज्ञात भामट्याने ₹२.७५ लाखांची ऑनलाईन फसवणूक (online cheating) केली आहे. टेलिकॉम कंपनीचा प्रतिनिधी (telecom company representative) असल्याचे भासवत ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) स्क्रीन शेअरिंग ऍप (screen sharing app) डाऊनलोड करण्यास सांगत, त्यानंतर त्याने ही रक्कम पळवली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकाला एका अज्ञात व्यक्तीने (unknown person) फोन करून तो एका प्रख्यात टेलिकॉम कंपनीचा (renowned telecom company) प्रतिनिधी बोलत असून, त्यांनी जर त्यांच्या सिमकार्डचे (SIM Card) केवायसी (KYC – Know Your Customer) लवकरात लवकर अपडेट केले नाही तर त्यांच्या मोबाईल नंबरची सेवा बंद केली जाईल असे सांगितले.
सेवेत व्यत्यय येण्याच्या भीतीने, ज्येष्ठ नागरिकाने यावर उपाय विचारला आणि अनोळखी कॉलरने त्यांना “एनी डेस्क’, जे स्क्रीन शेअरिंग ऍप्लिकेशन आहे डाऊनलोड करण्यास सांगितले. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी, ज्याची त्याने एक लिंक पाठवली होती.
“तक्रारदार यांना लिंक फॉलो करण्यासह त्यांचा मोबाईल नंबर, बँक तपशील आणि पासवर्ड टाईप करण्यास सांगितले,” असे यासंदर्भात पोलिसांनी सांगितले.
काहीच वेळात विविध व्यवहारांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून ₹२,७४,९०० काढले गेले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे समोर येताच आपली फसवणूक (cheating) झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ताबडतोब बँकेला कार्ड ब्लॉक करण्यास सांगत याबाबत पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (Indian Penal Code – IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (Information Technology Act) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
No comments yet.