पवईत मद्यधुंद चालकाची पार्क केलेल्या ४ वाहनांना धडक

प्रातिनिधिक छायाचित्र

पवईतील एका शाळेतील शिक्षिकेला गुरुवारी शाळेबाहेर सिल्व्हर ओक, हिरानंदानी येथे आपली रस्त्यावर पार्क केलेली १४ महिन्यांपूर्वी खरेदी केलेली कार बघून धक्काच बसला. एका मद्यधुंद टेम्पो चालकाने कारला धडक दिली होती. मद्यधुंद चालकाने केवळ त्याच नव्हे तर इतर अजून ३ अशा ४ गाड्यांना धडक देत त्यांचे नुकसान केले होते.

पवईतील तिच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान नोव्हेंबर २०२०मध्ये तिने कार खरेदी केली होती.

यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले की, घाटकोपर येथील रहिवासी असणाऱ्या कोठारी या संध्याकाळी ४च्या सुमारास आपले काम संपवून शाळेतून घरी जाण्यासाठी आपल्या गाडीजवळ येताच त्यांना धक्काच बसला. त्यांच्या गाडीला दुसऱ्या वाहनाने ठोकल्याने त्यांच्या गाडीचे चांगलेच नुकसान झाले होते. स्थानिकांकडून त्यांना कळाले की, सिल्व्हर ओक निवासी इमारतीजवळ रस्त्याच्या शेवटी उभ्या असलेल्या तिच्या कारसह टेम्पोने किमान चार गाड्यांना धडक दिली आहे. याबाबत पवई पोलिसांनी एका टेम्पो चालकाला रॅश आणि मद्यपान करून गाडी चालवल्याबद्दल अटक केली आहे.

त्या आपली तक्रार देण्यासाठी पवई पोलीस ठाण्यात पोहचल्या तेव्हा त्या ठिकाणी अजूनही ३ वाहनचालक तक्रार देण्यासाठी हजर होते.

“रमेश वाठोरे (३६) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना पार्क केलेल्या वाहनांवर धडकला होता. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. घटना घडताच त्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले.

“त्याला ताब्यात घेतला तेव्हा तो मद्यधुंद असल्याचा वास येत होता. वैद्यकीय तपासणी अहवालात तो परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मद्यधुंद असल्याचे दिसून आले,” पवई पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

मी सकाळी ७.४५ च्या सुमारास कार पार्क करते आणि दुपारी वाजता परत घरी जाण्यास निघते. गुरुवारी, जेव्हा मी माझ्या कारकडे परतले तेव्हा मला कारचे नुकसान झाल्याचे दिसले. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात कोठारी यांनी म्हटले आहे.

वाठोरे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ३३६ (मानवी जीवन किंवा इतरांची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे), ४२७ (दुर्घटना आणि त्यामुळे नुकसान) आणि मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.

, , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!