आत्महत्येची पोस्ट करून गायब असणाऱ्या ३६ वर्षीय वकिलाला मुंबई पोलिसांनी शोधून काढत त्याच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे. वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तीन तासांच्या आत त्याचा शोध घेण्यात आला. पवई येथील जंगल परिसरात तो बसलेला पोलिसांना मिळून आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, नाशिकचे रहिवासी असलेले वकील ४५ दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई येथे आपल्या मावशीच्या घरी आले होते. “रविवारी मावशीला फेसबुकवर त्याने लिहलेली एक पोस्ट दिसली ज्यामध्ये तो आत्महत्येचा प्रयत्न करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच, तो काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला होता. त्याचा फोन बंद असल्याने कॉल लागत नव्हता तसेच कोणतेही अपडेट मिळत नव्हते, त्यामुळे त्याच्या मावशीने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार केलो होती,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर लगेचच एका पथकाने तांत्रिक तपशील आणि मोबाईल लोकेशनसह तपशील गोळा करून तपास सुरू केला होता.
पोलीस पुढे म्हणाले, “पवईतील हिरानंदानीजवळील जंगल टेकड्यांजवळ हेलिपॅडसाठी असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राजवळ पोलिस पथकाला त्याचे लोकेशन मिळून आले. त्या अनुषंगाने एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरात पोहोचले. तेथील जंगल भागात तो बसलेला पोलिसांना मिळून आला.”
त्ताब्यात घेऊन समुपदेशनानंतर त्याला कुटुंबाला सोपवण्यात आले आहे.
आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३५ वर्षीय व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश वळवी याची पत्नी सततच्या भांडणाला कंटाळून जानेवारीपासून तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे. शनिवारी वळवी आरे रोड येथील तिच्या सासरच्या घरी गेला होता. आपल्या पत्नीला त्याच्याकडे परत पाठवण्याची…
पवई पोलिसांनी जप्त केलेली अरमान खान याची मोटारसायकलबाईकवरून स्टंट करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या एका २१ वर्षीय सोशल मिडिया इंन्फ्ल्युन्सर तरुणाला पवई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची विनापरवाना मोडीफाईड मोटारसायकल जप्त केली आहे. एवढ्यावरतीच न थांबता त्याचा मोटारसायकल चालवण्याच्या परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु…
पवई येथील जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एक तरुण आणि एक महिला दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांना संशयास्पद रित्या रोडवर सापडले होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. यातील आयआयटी मेनगेट बसस्टॉप पासून काही अंतरावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या विद्यार्थ्याचा ब्रेन हेमरेजमुळे मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत हिरानंदानी बसस्थानकाजवळ रस्त्यावर एक महिला मृतावस्थेत पोलिसांना…
No comments yet.