आयआयटी कॅम्पस आणि बिबट्या हे समीकरण जसे बनूनच आलेले आहे. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याकारणाने आयआयटी कॅम्पस परिसरात अधूनमधून बिबट्याचे दर्शन हे घडतच असते. अशाच एका बिबट्याचे दर्शन आजकाल येथील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांना घडत आहे.
बरेच दिवस गायब असणाऱ्या बिबट्याचा गेले दोन दिवस कॅम्पस परिसरात वावर दिसून येत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या रहिवाशी इमारती, हॉस्टेल्स आणि प्रयोगशाळा अशा विविध ठिकाणी हा बिबट्या नजरेस पडत आहे. बिबट्याच्या या बातमीने अनेकांना धडकी भरलेली आहे.
“कॅम्पसमधील अनंथा इमारतीच्या परिसरात काही लोकांनी त्याला प्रथम पाहिले होते. त्यानंतर त्याला अनेक ठिकाणी पाहिले गेले आहे. भौतिकशास्त्र प्रयोग शाळेजवळही त्याचा वावर आहे, येथील सिसिटीव्हीमध्ये सुद्धा तो कैद झाला आहे” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना आयआयटी मुंबईच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात वन विभागाला कळवल्यावर वन अधिकाऱ्यांनी कॅम्पस परिसरात भेट देवून त्याचा वावर असणाऱ्या ठिकाणाची पाहणी केली आहे. मात्र, त्याचा लपून बसण्याचा ठावठिकाणाबाबत माहित नसल्याने त्याला नक्की पकडायचा कसा असा प्रश्न वन विभागाच्या समोर आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.