आवर्तन पवई | पवई
पवई येथील गौतमनगर परिसरात फिरत्या कुत्र्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्याच्या गुन्ह्यात जनावर संचारलेल्या एका विकृताला पवई पोलिसांनी काल अटक केली आहे. कुलदीप (१९) असे या तरुणाचे नाव आहे. याच परिसरात ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. ज्यानंतर दोन्ही मुलांनी विष घेवून आत्महत्या केली होती.
पवईच्या गौतमनगर येथे राहणारे इंद्र भारद्वाज पत्नीबरोबर घराबाहेर बसलेले असताना एक तरुण आपल्या हातात एक कुत्रे घेवून जाताना त्यांना दिसला. कदाचित कुत्रा मेला आसावा आणि तो तरुण त्याला फेकण्यासाठी जात असावा असे त्यांना वाटले. तो मेलेला कुत्रा त्यांच्या घराजवळ टाकल्यास दुर्गंधी येईल म्हणून ते त्यास पाहत असताना त्यांच्या लक्षात आले कि तरुण कुत्र्याला घेवून जवळच असणाऱ्या सार्वजनिक शौचालात गेला आहे.
भारद्वाज यांना शंका आल्याने त्यांनी आपले शेजारी चव्हाण यांना घेवून तिथे गेले. “आतून कुत्र्याचा आवाज येत असल्याने आत नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी दरवाजाला धक्का देवून उघडताच, कुत्र्याने पळ काढला तर तरुण नग्न अवस्थेत तसाच समोर उभा होता. आम्ही त्यास विचारणा केली असता ‘अंकल किसी को बोलो मत, मैने कुत्ते के साथ गलत काम किया है | मुझे माफ कर दो |’ सांगितले.” असे भारद्वाज यांनी आपल्या पोलीसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे.
तरुणाच्या या विकृतीची माहिती त्यांनी लगेच पवई पोलिसांना दिली. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलांवर सुद्धा याच परिसरात अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. ज्यानंतर दोन्ही मुलांनी घाबरून विष घेवून आत्महत्या केली होती.
पवई पोलिसांनी भादवि कलम ३७७ नुसार गुन्हा नोंद करून आरोपी तरुण कुलदीप याला अटक केली आहे.
(या बातमीच्या माध्यमातून प्राणीमित्रांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नसून, प्राण्यावर झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याच्या माध्यमातून जनावर संचारलेल्या मानवाच्या विकृतिला समोर आणण्याचा आहे – वृत्तसंपादक)
No comments yet.