पवई, आयआयटी येथील रमाबाईनगर येथील घरात घुसून दोन मोबाईल लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे पवईत घडली आहे. मोबाईल चोरी करून पसार होणारा हा संशयित चोरटा येथील सिसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरु आहे. अशा प्रकारे घरात घुसून चोरी करणारी टोळीच परिसरात कार्यरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गणेश गायकवाड हे आयआयटी येथील रमाबाईनगर येथे आपल्या परिवारासोबत राहतात. बुधवारी पहाटे जेव्हा ते जागे झाले तेव्हा घरातील टेबलवर ठेवलेले त्यांच्या घरातील दोन मोबाईल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात शोधाशोध करूनही सापडत नसल्याने आणि फोन बंद येत असल्याचे पाहता त्यांनी परिसरात असणाऱ्या सिसीटीव्हीचे फुटेज पाहिले असता, एक अनोळखी तरुण त्यांच्या घरातून लगबगीने निघत असल्याचे आढळून आले.
‘आमच्या वरच्या माळ्यावर असणाऱ्या खोलीत मी दोन मोबाईल (रेड-मी ५आणि सोनिक्स प्रिया) टेबलवर ठेवलेले होते. सकाळी ते गायब असल्याचे लक्षात येताच सिसीटीव्ही पाहिले असता एक तरुण माळ्याच्या शिडीवरून उतरत असताना दिसला. याबाबत मी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, असे याबाबत बोलताना गायकवाड याने सांगितले.
आयआयटी भागात घरातील वस्तू चोरी होण्याची ही पहिलीच घटना नसून, अशा प्रकारच्या घटना अधून मधून घडत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले. केवळ एक व्यक्ती नसून पुरुष आणि स्त्रिया मिळून अशी ही एक टोळीच येथे सक्रिय असल्याचे स्थानिकांनी याबाबत बोलताना सांगितले.
No comments yet.