@प्रमोद चव्हाण | मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग आणि बौद्ध विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून आज, ७ एप्रिल २०२० सकाळी १० ते २ या वेळेत चंद्रमणी बुद्ध विहार, माता रमाबाई आंबेडकर नगर येथे फिव्हर क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टंन्सिंग पाळत परिसरातील जवळपास १५० नागरिकांनी याचा लाभ घेतला. सुदैवाने यातील एकही रुग्ण संशयीत असल्याचे समोर आले नाही.
खाजगी क्लिनिक बंद असल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांची संख्या पाठीमागील पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अन्य रुग्णसेवेवर याचा परिणाम जाणवत आहे. यासाठी पालिकेने आता मुंबई उपनगर आणि मुंबई शहरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केले आहेत. विशेषतः अलगीकरण केलेल्या भागाच्या जवळपास या केंद्रांना सुरु करण्यात येणार आहे.
सध्या कोरोनाने मुंबईत थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. पवईच्या २ विविध भागात मिळून ३ बाधित रुग्ण मिळून आल्याने नागरीकांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे. त्यातच पाठीमागील आठवड्यात आयआयटी येथील चाळ सदृश्य लोकवस्तीत एक पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्याने या भागाला सील करण्यात आले आहे. या परिसरात चाळसदृश्य मोठी लोकवस्ती आहे, त्यामुळे येथे खबरदारी नाही घेतली तर समूह संसर्गाचा (कम्युनिटी स्प्रेड) मोठा धोका संभवतो. ताप, सर्दी, खोकला अशी कोविड -१९ आजाराशी निगडीत लक्षणे आढळली की नागरिक घाबरून जात आहेत. खाजगी क्लिनिक बंद असल्याने नागरिक पालिकेच्या दवाखान्यात धाव घेत आहेत मात्र तिथेही मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत आहे.
कोविड सदृश्य लक्षणे असली तर केवळ पालिकेच्या रुग्णालयात किंवा त्यांनी निश्चित केलेल्या रुग्णालयात उपचार होत आहेत. पण काही रुग्ण थेट कस्तुरबा, नायर, के ई एम, सायन, कुपर अशी रुग्णालय गाठत असल्याने या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ज्याला पाहता पालिकेने मुंबईच्या काही भागात फिव्हर क्लिनिक सुरु केली आहेत. जिथे जावून नागरिक आपली तपासणी करून घेवू शकतात. यावेळी संशयित वाटणाऱ्या रुग्णाचे त्वरित नमुने घेवून त्यांना पुढील उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात शिफ्ट केले जाणार आहे.
पवई परिसरात समूह संसर्ग नाही
पवईमध्ये या चाळसदृश्य वस्तीत साध्या सर्दी खोकल्याने सुद्धा लोक घाबरले असल्याने बौद्ध विकास मंडळ आणि मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने चंद्रमणी बुद्ध विहार येथे फिव्हर क्लिनिक बनवण्यात आले होते. पालिका रुग्णालयाचे डॉक्टर सुजीती ठाकरे आणि नायर रुग्णालयाचे ४ डॉक्टर यावेळी उपस्थित होते. या डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. “आयआयटी परिसरात राहणाऱ्या जवळपास १५० नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली,” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना संस्थेचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, “तपासलेल्या सर्व नागरिकांमध्ये साधा सर्दी, ताप, खोकला अशीच लक्षणे होती असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी पवई परिसरात समूह संसर्ग नाही. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घरातच बसावे.”
यावेळी बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊ पंडागळे, सचिव संजय गाडे, खजिनदार अरुण वानखेडे उपस्थित होते.
English Summary
BMC Fever Clinic setup in Powai
The BMC established a Fever Clinic at the Chandramani Buddha Vihar in the Ramabai Ambedkar Nagar in Powai from 10am to 2pm today. The Mumbai Municipal corporation’s Health Department set up the clinic, in collaboration with the Powai Boudha Vikas Mandal. Nearly 150 Powai residents have benefited from this social surveillance, initiative, and in a positive development, none of the patients have been suspected of Covid – 19.
Following the closure of private clinics and the rampant fear of the coronavirus , the number of patients suffering from symptoms of Covid – 19, like fever, cold and cough has increased exponentially in the BMC’s hospitals over the past two weeks. This is affecting other patients. Keeping these developments in mind the Municipal Corporation has now initiated Fever Clinics in Mumbai’s suburbs and city areas. These centres will be organised, especially around the containment areas marked by the civic authorities.
बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा
No comments yet.