दोन नवजात मांजरीच्या पिल्लांना एका सोसायटीच्या सफाई कर्मचाऱ्यांने क्रूरपणे आणि बेकायदेशीरपणे निर्जनस्थळी सोडले होते, त्यातील एक मांजर पवई परिसरात मिळून आले आहे. प्राणीप्रेमी नेहा शर्मा यांनी याबाबत पवई पोलीस ठाण्यात रामचंद्र नावाच्या सफाई कर्मचाऱ्या विरोधात याबाबत गुन्हा नोंद केला होता.
“आम्हाला आनंद आहे की दोन हरवलेल्या मांजरीच्या पिल्लांपैकी एक पिल्लू आमच्या लेकहोम सोसायटीच्या जवळ असलेल्या चिखलाच्या, दलदलीच्या भागात मिळून आले आहे. आता आम्ही आशा करत आहोत की दुसरे मांजरीचे पिल्लू सुद्धा लवकरच सापडेल. नवजात मांजरीचे पिल्लू विस्थापित करण्याच्या संदर्भात भादवि कलम ४२९ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०च्या कलम ११ (१) अंतर्गत पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. आवर्तन पवईने १४ सप्टेंबरला याबाबत बातमी प्रकाशित केली होती.
नेहा शर्मा या एक मांजर आणि त्याच्या दोन पिल्लांचे पवईतील लेकहोम कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या आवारात काळजी घेत होत्या. “४ सप्टेंबर रोजी, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने पाहिले की मांजरीची पिल्ले सोसायटीमध्ये त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी नाहीत. अनेक तासांच्या शोधानंतरही त्यांना मांजरीचे पिल्लू मिळून आली नाहीत. शोधाच्या वेळी त्यांना हे देखील कळले की, सफाई कर्मचाऱ्याने (रामचंद्र) मांजरीचे पिल्ले एका पिशवीतून नेऊन त्यांना बाहेर कुठेतरी सोडून दिले आहे. याबाबत शर्मा यांनी रामचंद्रला विचारले असता त्याने निर्लज्जपणे हसत उडवा उडवीची उत्तरे दिली.
काहीच मागमूस लागत नसल्याने शर्मा यांनी ज्येष्ठ पशु कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत ८ सप्टेंबर रोजी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.
“मांजरीचे एक पिल्लू मिळून आल्याचा आम्हाला आनंद आहे आणि दुसरे सुद्धा लवकर मिळेल असा विश्वास आहे. मिळून आलेल्या मांजरीच्या पिल्लाला स्विकारण्यासाठी अनेक विनंत्या सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे त्याला त्याचे हक्काचे घर मिळेल याचा आनंद आहे.” असे याबाबत बोलताना नेहा शर्मा यांनी सांगितले.
No comments yet.