केवायसी फसवणूकीत आयआयटीच्या विद्यार्थिनीने गमावले ८६ हजार

पवईस्थित आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी केवायसी फसवणूकीची नवीनतम बळी ठरली आहे. सायबर चोरट्याने केवायसीच्या नावाखाली तिच्या खात्यातून ८६ हजार रुपये उडवले आहेत. यासंदर्भात पवई पोलीस ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार तरुणी ही पवईतील आयआयटी-मुंबईमध्ये एम टेकचे शिक्षण घेत आहे. २४ एप्रिलला ती आपल्या कॅम्पसमध्ये असताना तिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. तिच्या मोबाईल सर्व्हिस प्रदात्याच्या कार्यालयातून बोलत असून, केवायसी न केल्यामुळे तिचा सिम निष्क्रिय होऊ शकतो असे त्याने सांगितले. तसेच कॉलरने केवायसी पूर्ण करण्याच्या बहाण्याने टीमव्ह्यूअर क्विक सपोर्ट नामक अॅप तिला आपल्या फोनमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. मात्र तिच्या बँक खात्यातून एकाधिक व्यवहाराच्या माध्यमातून ८६ हजार रुपये काढल्याची लक्षात येताच तिने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून, आम्ही अधिक तपास करत आहोत,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!