ऑनलाइन वाईन मागवणे एका २६ वर्षीय एनआरआय विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले आहे. २६ वर्षीय पवईत राहणारा विद्यार्थी अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे इंटरनेटवर दुकानाचा नंबर मिळाल्यानंतर ऑर्डर करण्याच्या प्रयत्नात त्याने अडीच लाख रुपये गमावले आहेत.
गब्बू रंधावा (बदललेले नाव) याला त्याच्या एनआरआय खात्यातून फंड ट्रान्सफर व्यवहारांबद्दल संदेश प्राप्त झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
दोन महिन्यांपूर्वी मुंबईत परतलेल्या आणि आई-वडिलांसोबत राहणाऱ्या गब्बूने ३ मार्च रोजी पार्टी करण्याचा बेत आखला. वाईन ऑर्डर करण्यासाठी त्याने वाईन शॉपचा संपर्क क्रमांक ऑनलाईन शोधला. समोरील व्यक्तीने आपले नाव दिनेश असल्याचे सांगत तक्रारदाराकडे त्याच्या कार्डसचे डिटेल्स मागितले आणि त्याने ही पेमेंट करण्यासाठी त्याचे बँकिंग कार्ड तपशील शेअर केले. ७८६ रुपये किंमतीच्या वाईनच्या सहा बाटल्याच्या बदल्यात त्याच्या खात्यातून अडीच लाख रुपये डेबिट होताच त्याने पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे, असे पवई पोलिसांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले “तक्रारीच्या आधारावर आम्ही कोणाच्या खात्यात पैसे जमा झाले याची माहिती घेण्यासाठी बँकेकडून तपशील मागवला आहे. तसेच, गब्बूचा कॉल घेणाऱ्या आणि वाईन शॉपचा कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या दिनेशचा शोध घेण्यासाठी आम्ही कॉल डेटा रेकॉर्ड मागवले आहेत.
No comments yet.