छायाचित्र: ANI

चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेतील विद्यार्थ्याचा पडून मृत्यू

गुरुवारी सकाळी १०.१५ वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत आपल्या मित्रांसोबत खेळत असताना चांदिवलीतील पवार पब्लिक शाळेत पहिलीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा पडून मृत्यू झाला. स्वरांग दळवी (६) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचे वडील भांडूपच्या शाळेत संगीत शिक्षक आहेत. “स्वरांग हा आपल्या शालेय मित्रांसोबत मधल्या सुट्टीत शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता. खेळत असताना अचानक तो पडल्याची माहिती […]

Continue Reading 0
nsg cmnd house theft

एनएसजी कमांडोच्या घरातून रिव्हॉल्व्हर, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना अटक

मि लिंदनगर म्हाडा येथील इमारतीत राहणारे एनएसजी कमांडो संदिप पानतावणे (३२) यांच्या घरात घुसून, चोरी करून त्यांची वैयक्तिक रिव्हॉल्व्हर, २० जिवंत काडतूस, ३ तोळे सोने आणि चार हजाराची रोकड लंपास करणाऱ्या दोन चोरांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. शमिम सलिम शेख (२३) आणि सादिक अक्कानी शेख (२३) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून, […]

Continue Reading 0

वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम

आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]

Continue Reading 0

पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अफवा कि सत्य?

कालपासून सोशल मिडियावर पवई तलावातून एक मगर बाहेर आल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवर्तन पवईने जेव्हा पवई पोलीस, प्राणीमित्र संघटना ‘पॉज मुंबई’ आणि वन विभाग यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यातील कोणाकडेही पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अधिकृत तक्रार किंवा माहिती कळवण्यात आलेली नसल्याचे या सर्वांनी स्पष्ट केले. काल जोरदार […]

Continue Reading 0
IMG_9666ab

पवई तलावावर गणेश विसर्जनाचे थांबलेले कार्य पूर्ववत

मुंबईत आज सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुळे पवई तलावात सुरु असणारे गणेश विसर्जन काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर ओसरताच पवई तलावातील विसर्जन कार्य पूर्ववत झाले आहे. शुक्रवारी विराजमान झालेल्या गणेशांपैकी पाच दिवसांच्या गणपतींचे आज ठिकठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. पूर्व उपनगरातील अनेक गणेशांचे पवई […]

Continue Reading 0

चांदिवली इमारत दुर्घटना: मृतांची संख्या चार, बचावकार्याला गती

शनिवारी चांदिवली, संघर्षनगर येथे इमारत पडण्याचे काम सुरु असताना झालेल्या दुर्घटनेत त्याच दिवशी एकाचा मृत्यू झाला होता. रविवारी रात्री ढिगाऱ्याखालून काढलेल्या अजून एक कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सोमवारी बचाव पथकाच्या हाती अजून दोन कामगार लागले असून, त्यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता चार झाली आहे. सोमवारी संध्याकाळी बचावकार्य सुरु असताना […]

Continue Reading 0
IMG_20170826_184232.jpg

​चांदिवली इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या दोनवर; सततच्या पावसामुळे बचावकार्य संथगतीने

चांदिवली, संघर्षनगर येथील क्रिस्टल पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना शनिवारी झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या आता दोन झाली आहे. बचावकार्य करणाऱ्या पथकाला सोमवारी रात्री २.४० वाजता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांपैकी अजून एकाला बाहेर काढण्यात यश आले. त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवल नाईक (२२) असे या […]

Continue Reading 0
IMG_20170826_184232.jpg

चांदिवलीत इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, दोन जखमी, बचावकार्य सुरु

चांदिवली, संघर्षनगर बस स्टॉपजवळील कृष्णा बिसनेस पार्क या इमारतीला पाडण्याचे काम सुरु असताना इमारतीचा वरील माळ्यांचा काही भाग कोसळल्याची घटना आज (शनिवारी) संध्याकाळी घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली अजून ४ ते ५ लोक अडकल्याची शक्यता असून, अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने बचावकार्य सुरु आहे. […]

Continue Reading 0
तक्रारदार शकिल 'एफआयआर' दाखवताना

खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या

फिल्टरपाडा येथील दुकानदारांने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला जबर मारहाण करून त्याच्या दुकानाचे नुकसान करणाऱ्या खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शोयब अमीर खान (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शकील शेख यांचे फिल्टरपाडा येथे सना इंटरप्रायजेस नामक दुकान आहे. आरोपी […]

Continue Reading 0
IMG_1149

पवई हिरानंदानीमध्ये सोनू निगम आणि गोविंदा यांनी केले आनंद मिलिंद म्युजिक अकॅडमीचे उदघाटन

पवई, हिरानंदानी येथे असणाऱ्या हिरानंदानी लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये काल शनिवारी बॉलीवूडलमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी आनंद-मिलिंद यांच्या ‘”आनंद मिलिंद अकॅडमी ऑफ म्युजिक”चे उदघाटन गायक सोनू निगम आणि अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बांधकाम व्यवसायात उच्च शिखरावर विराजमान असणाऱ्या हिरानंदानी गृपतर्फे शिक्षण संस्था सुध्दा चालवल्या जात आहेत. याचाच एक भाग […]

Continue Reading 2

पवईत दिवसाढवळ्या बाईकस्वारांनी पळवली महिलेची सोन्याची चैन

आयआयटी, पवई येथील जीएल कंपाऊंडजवळ कामावरून परतत असणाऱ्या एका महिलेची बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सोन्याची चैन खेचून पळवल्याची घटना पवईत घडली. मिना पंडागळे असे या महिलेचे नाव असून, त्या गरीबनगरमध्ये राहतात. मिना या सकाळी आपल्या सहकारी महिलांसोबत घरी परतत असताना हिरानंदानी हॉस्पिटलजवळ असणाऱ्या हॉटेल गोल्ड कॉइन जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी गळ्यातील दोन सोन्याच्या […]

Continue Reading 0

नवनिर्मित विजय विहार रोडला खड्डे

पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र […]

Continue Reading 0

पवई अनैसर्गिक अत्याचार घटनेतील आरोपीना पकडण्यात होत असणाऱ्या दिरंगाई विरोधात स्थानिकांचा निषेध मोर्चा

पवई मोरारजी नगर येथे दोन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारा नंतर त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली होती, या घटनेला महिना उलटूनही आरोपी मोकाट असल्याने स्थानिकांनी आज मोरारजी नगर ते पवई पोलिस ठाणे असा निषेध मोर्चा काढला. आरोपीना त्वरित अटक करून कडक शिक्षा दया. केस सीबीआयकडे सोपवा. आशा मागण्या यावेळी मोर्चेकरूंनी पोलिसांसमोर ठेवल्या. १२ जुलैला रात्री मोरारजीनगर […]

Continue Reading 0

पवई हॉस्पिटलजवळच्या गटाराच्या ढाकणाची अखेर दुरुस्ती

आयआयटी, पवई येथील पवई हॉस्पिटल जवळ चौकात असणाऱ्या गटाराच्या ढाकणाचे दुरुस्तीचे काम नागरिक, माध्यम आणि स्थानिक प्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर अखेर आज करण्यात आले आहे. या कामामुळे लोकांना असणारा जिवाचा धोका टळल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आयआयटी येथील पवई हॉस्पिटल चौकात एक गटाराचे ढाकण गेल्या २ महिन्यापासून दुरावस्थेत होते. ढाकणाच्या बाजूला असणारा भाग चारीही बाजूने तुटल्याने […]

Continue Reading 0

पवईतील जेव्हीएलआरवरील मारुती मंदिराला तात्पुरता दिलासा

पवईतील  आयआयटी येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर असणाऱ्या मारुती मंदिर प्रशासनाने कारवाई थांबण्यासाठी कोर्टात धाव घेतल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने याला तात्पुरती स्थगिती देत, ३ ऑगस्ट पर्यंत नोटीसवर कोणताही निर्णय घेवू नये असे आदेश पालिकेला दिले आहेत. आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी – विक्रोळी लिंक) गेल्या ९२ वर्षापासून मारुती मंदिर उभे आहे. पुढे जेव्हीएलआरच्या निर्मिती नंतर हे […]

Continue Reading 0

पवईतील विद्यार्थ्यांची ‘प्लास्टिक फ्री पवई’ची मोहीम

पवईला प्लास्टिक फ्री करण्यासाठी पवईतील हिरानंदानीमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, परिसरात ‘प्लास्टिक फ्री पवई’ मोहीम राबवत आहेत. लोकांनी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी ते परिसरात गेल्या महिनाभरापासून जनजागृती करत आहेत. मुंबईतील हिरानंदानी फाऊन्डेशन स्कूल, ओबेरॉय स्कूल, इकोलेमोन्डेले स्कूल, एस. एम. शेट्टी स्कूल अशा नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या श्लोक बाबू, […]

Continue Reading 0
crime1

पवई अनैसर्गिक लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपींना पाहणारा साक्षीदार मिळाला

पवईतील गौतमनगर येथे शालेय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना ओळखणारा एक साक्षीदार पवई पोलिसांना मिळाला आहे. त्याच्या साक्षीच्या आधारावर पवई पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. वाचलेल्या मुलाचे यकृत निकामी झाले असून, डॉक्टरांनी त्याला प्रत्यारोपणाचा सल्ला दिला आहे. गेल्या आठवड्यात गौतमनगर येथे राहणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांनी त्याला दवाखान्यात दाखल […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!