पवई हॉस्पिटलजवळच्या गटाराच्या ढाकणाची अखेर दुरुस्ती

आयआयटी, पवई येथील पवई हॉस्पिटल जवळ चौकात असणाऱ्या गटाराच्या ढाकणाचे दुरुस्तीचे काम नागरिक, माध्यम आणि स्थानिक प्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर अखेर आज करण्यात आले आहे. या कामामुळे लोकांना असणारा जिवाचा धोका टळल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

आयआयटी येथील पवई हॉस्पिटल चौकात एक गटाराचे ढाकण गेल्या २ महिन्यापासून दुरावस्थेत होते. ढाकणाच्या बाजूला असणारा भाग चारीही बाजूने तुटल्याने येथे रस्त्याने चालणाऱ्या माणसाचा पाय अडकून पडण्याची, फसून इजा होण्याची मोठी शक्यता होती. येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांची चाके अडकून पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. स्थानिकांनी याबाबत पालिका आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही प्रशासन ठम्म होते.

“दोन शाळा आणि रुग्णालय येथून हाकेच्या अंतरावर आहेत. अनेक शालेय विद्यार्थी येथूनच प्रवास करत असतात, त्यांचा पाय अडकून, फसून त्यांना मोठी इजा किंवा जिवावर बेतण्यासारखे प्रसंग सुद्धा घडू शकले असते. मात्र स्थानिक प्रतिनिधीना त्याचे काहीच देणेघेणे पडले नाही” असे याबाबत बोलताना येथील काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

“गटाराचे ढाकण खराब आहे म्हणून मी तक्रार केली होती, त्याच्यावर पालिकेने येवून ते ढाकण बदलले होते. मात्र त्याच्या बाजूला असणारा तुटलेला भाग ठिक करायला बहुतेक ते विसरून गेले. पुढे ते तसेच उघडे राहिले, त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना रस्त्यावर एकटे सोडायला सुद्धा भिती वाटतेय” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!