पवई इंग्लिश हायस्कूलचा दुसरा तारा चमकतोय युट्यूबच्या दुनियेत
स्मार्टफोनच्या उदयानंतर अनेक हौशींनी आपलं युट्यूब चॅनेल (YouTube Channel) काढून आपल्यातली कला जगासमोर नेण्याचा प्रयत्न केला. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण युट्यूबवर आपल्या कलेचे सादरीकरण करत असतात. मात्र व्हिव्हर्सना बांधून ठेवण्यात सगळेच यशस्वी होतात असे नाही. मात्र पवईतील एका १४ वर्षीय व्लॉगरने (vlogger) हे यश संपादन करण्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. अंगात कला असेल तर ती लपून राहत नाही, हे वाक्य देखील पुन्हा एकदा सर्वांना पटले आहे. त्याच्या या प्रयत्नाला युट्यूबवर लाखो लोकांनी पसंती दिली आहे. तर युट्यूबने देखील याची दखल घेत त्यांच्या चॅनेलला सिल्व्हर प्ले बटन (Silver Play Button) देत त्याच्या सन्मान केला आहे.
पवईकर निखील शर्मा (Nikhil Sharma) म्हणजेच ‘मुंबईकर निखील (Mumbaikar Nikhil) याने युट्यूब जगतात आपल्या ट्राव्हल आणि लाइफस्टाइल व्लॉगच्या (travel and lifestyle vlog) माध्यमातून एक ठसा उमटवला असून, व्लॉगींगच्या जगतात आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. आता याच पावलावर रेहान खानच्या रुपात अजून एक निवीन नाव कोरले जात आहे. या दोन्ही नावाची आणखी एक विशेषतः म्हणजे निखील हा पवई इंग्लिश हायस्कूलचा (Powai English High School) माजी विद्यार्थी आहे तर रेहान हा याच शाळेत यावर्षी १०वीत शिकत आहे.
लाइफस्टाइल व्लॉगर असणाऱ्या रेहानने नुकताच जानेवारी महिन्यात १ लाख सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण केला. हे स्थान मिळवल्याबद्दल युट्यूबकडून त्याला सिल्वर प्ले बटन प्रदान करण्यात आले आहे.
अक्टिंगची आवड असणाऱ्या रेहानला अक्टिंगच्या विश्वात काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. मात्र यासाठी ऑडिशन्स देत असतानाच जगावर आलेल्या कोरोनाच्या (covid-19) संकटाने संपूर्ण जगाला थांबवले होते. देशात लागलेल्या लॉकडाऊनमुळे आता पुढे काय? असा विचार सुरु असतानाच व्लॉगींग म्हणजेच युट्यूबच्या जगतात त्याने पाऊल ठेवले.
सुरुवातीला ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘पवई का मेला’ बिगेस्ट थाली आणि शॉपिंग @ मुंबई मार्केट सारख्या विषयांवर त्याने व्लॉग बनवले. मात्र प्रत्येक युट्युबर सोबत जे घडते तेच त्याच्या सोबत ही घडले. अगदी ६० – ७० व्हिवज मिळत होते. हळू हळू काही काळातच त्याने १००० आणि पुढे १० हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला. जो त्याला प्रेरणा देणारा ठरला आणि याचवेळी त्याने आपल्या हेअर कटवर बनवलेला व्लॉग चांगलाच व्हायरल होत बघता बघता वर्षभराच्या आत त्याने १ लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे.
अगदी एक मोबाईल (mobile) आणि छोट्या ट्राईपौडच्या (tripod) मदतीने सध्या तो व्लॉगींग करत आहे. त्याचे व्हिडिओ युट्यूबवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या त्याच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळत आहेत.
युट्यूबच्या जगतातील अजून एक मोठे नाव असणाऱ्या लाईफ स्टाईल यूट्यूबर फ्लाईंग बिस्ट (flying beast) म्हणजेच गौरव तनेजा (Gaurav Taneja) याला आदर्श मानतो. आपल्या आदर्श स्थानी असणाऱ्या गौरव सारखाच तो एक यशस्वी युट्युबर बरोबरच कायद्याचे शिक्षण घेण्यात रुची ठेवतो. विविध सेलिब्रिटीज सोबतच त्याने राखी सावंत सोबतच्या गप्पांचा एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला चांगलेच व्हिवज मिळत आहेत.
आपल्या युट्यूब जगतातील पहिल्या यशाचा आनंद त्याने नुकताच आपल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शेअर केला. यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शर्ली उदयकुमार म्हणाल्या, “रेहान अभ्यासात हुशार आहेच पण अभ्यासासोबतच नवीन युगात ही मुले आपले स्थान निर्माण करत यश संपादन करत आहेत हे पाहून खूप आनंद होतोय. मुलांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शाळेचे प्रमुख उद्दिष्ट असून मुलांना विविध क्षेत्रात यशस्वी होताना पाहून खूप आनंद होत आहे.”
“आता मलाही युट्यूब आवडायला लागलंय. लोकांचे नवनवीन व्हिडीओच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधन करायला मजा येते आहे. मात्र सध्या माझे पूर्ण लक्ष माझ्या १०वीच्या परीक्षेवर आणि अभ्यासावर आहे. हे पूर्ण होताच अजून चांगले चांगले व्हिडीओ लोकांना पाहायला मिळणार आहेत.” असे यावेळी बोलताना रेहानने सांगितले.
Rehan Khan Vlogs
https://www.youtube.com/c/RehanKhanvlogs7070/videos
No comments yet.