पवईकर सुनील लेंगारे यांना अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य क्रीड़ा पुरस्कार प्रदान

कराटे क्षेत्रामधील केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कामगिरी बद्दल पवईकर सुनील लेंगारे यांना “अभिमान महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२२” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासाठी सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

“अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार” सोहळ्यामध्ये यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या एलिजा नेल्सन (इंडियन फील्ड हॉकी प्लेअर), निलेश शेलार (अध्यक्ष किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र), यामिनी सुनिल महामुणकर ( मिस फॅशनिस्ट २०१८, न्यूज १८ लोकमत अँकर), श्रीकांत नायडू (मिमिक्री आर्टिस्ट डॉक्टर गुलाटी कपिल शर्मा शो), रसिका वेंगुर्लेकर (मराठी अभिनेत्री व महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम), शशिकांत केरकर (आर्टिस्ट), मनीष अडविलकर (फिटनेस ट्रेनर, बॉडी बिल्डर), रवी वंजारी (शरीर सौष्ठव) यावेळी उपस्थित होते.

 

, , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!