संविधान किंवा आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मी सोडणार नाही – रामदास आठवले

@रविराज शिंदे

भाजप सरकार बाबासाहेबांनी लिहलेलं संविधान आणि मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण नष्ट करण्याच्या तयारीत आहे अशी अफवा काहीजण पसरवत आहेत.  मात्र हे सत्य नसून, भाजप सरकार विरोधात खोट्यानाट्या अफवा पसरवून आंबेडकरी चळवळीतील लोकांना भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र, जर कोणी संविधान किंवा आरक्षणाला नष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्यांना सोडणार नाही. असा इशाराच सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. पवईतील निटी येथे रिपाइं वार्ड क्रमांक १२१ तर्फे आयोजित केलेल्या जल्लोष भीमजयंतीचा कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘जल्लोष भिमजयंतीचा’ हा सदाबहार कवालीचा भव्य दिव्य कार्यक्रम पवईतील निटी येथे काल संपन्न झाला. वॉर्ड अध्यक्ष देविदास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. मिलिंद विद्यालयाचे ट्रस्टी रावराणे सर, स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे, शिवसेनेचे मनिष नायर, आदी मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी कवालीकर छाया मोरे आणि कर्तव्य शिंदे यांच्यात भीमसंगीत गाण्यांवर अफलातून जंगी सामना रंगला.

आंबेडकरी समाजाने एकत्र आले पाहिजे, त्यासाठी गटतट विसरून रिपब्लिक ऐक्य होणे ही काळाची गरज आहे. मात्र एकत्रित आलेल्या लोकांच्यात फाटाफूट होण्यास एक क्षणही लागत नाही, अशी खंतही आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!