मुंबईत आता गारठा वाढू लागला असून, शुक्रवारी मुंबईत आतापर्यंतचे सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. सांताक्रूझ हवामान वेधशाळेत या दिवशी १९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले जे सामान्यते पेक्षा कमी होते. तर दक्षिण मुंबईच्या कुलाबा हवामान स्टेशनमध्ये २२.५ अंश डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पवईमध्ये शुक्रवारी मुंबईतील सर्वात कमी म्हणजेच १८.३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शुक्रवारी पूर्वी १० नोव्हेंबरला मुंबईत १९.२ डिग्री सेल्सियस आणि ७ नोव्हेंबरला १९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते. परंतु, उर्वरित महिन्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या वर राहिले. ८ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबरला ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते जे या मोसमातील सर्वाधिक किमान तापमान नोंदवले गेले होते.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १ डिसेंबर रोजी मुंबईत रात्रीचे तापमान २४.४ अंश सेल्सिअस इतके होते, जे ११ वर्षातील डिसेंबर मधील दुसर्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे.
पूर्वेकडून ईशान्य दिशेकडे जाणाऱ्या थंड वाऱ्यामुळे रात्रीचे तापमान कमी होत आहे. शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली. थंड हवामानामुळे शहरातील काही ठिकाणी २० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे मुंबईकरांना सुखद पहाटेचा अनुभव मिळाला, असे याबाबत बोलताना हवामान खात्याने सांगितले.
शुक्रवारी मुंबईतील सर्वांत कमीतकमी किमान तापमान पवई येथे १८.३२ अंश सेल्सिअस तर पाठोपाठ कांदिवली येथे १८.३३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
तापमानात घट झाल्याने वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शुक्रवारी मध्यम श्रेणीत राहिले. मुंबईतील वरळी हे एकमेव ठिकाण होते ज्यामध्ये समाधानकारक ९८ एक्यूआय नोंदवली गेली.
No comments yet.