पवई तलावातील मगरींचे संवर्धन, पालकत्व स्विकारण्यास पालिका, वन विभागाची टोलवाटोलवी

DSCN0221वई तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पवई तलाव प्रदूषित झाला असून, मगर दर्शन घडणाऱ्या मुंबईतील एकमेव पवई तलावातील मगरींचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. तलावातील वाढत्या प्रदूषणामुळे तलावात असणाऱ्या मगरींचा आधिवास संपुष्टात येत असल्याबाबत प्राणीमित्र आणि पर्यावरणवादी संस्थांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, या मगरींचे संवर्धन करण्यास व पालकत्व घेण्यास महापालिका आणि ठाणे वन विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत टोलवाटोलवी करत आहेत असा आरोप पर्यावरणवादी संस्थांकडून होत आहे.

“मुंबईचे नैसर्गिक वैभव असणाऱ्या पवई तलावात सोडल्या जाणाऱ्या दुषित पाण्यामुळे तलावात असलेल्या जलचरांना याचा त्रास होत आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असून, त्यांची गणना न झाल्याने त्यांचा खरा आकडा समोर आलेला नाही आहे. मात्र तलावातील काही ठरलेल्या भागात मगरींचे दर्शन नित्यनियमाने होत असल्याने हे मुंबईकरांसाठी आकर्षणाचे ठरत आहे. मात्र तलावात सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी, तलावात फेकला जाणारा कचरा, व सौंदर्यकरणाच्या नावावर चालणाऱ्या कामामुळे मगरींचे तलावाच्या किनाऱ्यांनजीकचे अधिवास उध्वस्त झाल्याने त्यांना अंडी घालणे अडचणीचे झाले आहे. शिवाय प्रदूषणामुळे त्यांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे,” असे आवर्तन पवईशी बोलताना पॉज मुंबई या पर्यावरणप्रेमी संस्थेचे संस्थापक प्रमुख सुनीश सुब्रामण्यम कुंजू यांनी सांगितले.

या संदर्भात तक्रार घेवून पालिकेकडे गेले असता, महानगरपालिका अभियंते व पशू वैद्यकीय अधिकारी हे ठाणे वन विभागाकडे बोट दाखवत आहेत. तर ठाणे जिल्हा वन अधिकाऱ्याचे म्हणणे आहे कि ‘तलवात हिंस्र मगरी असून, तलावात उतरू नये’ असे फलक आम्ही ठिकठिकाणी लावले आहेत. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यावरून पालिका व वन विभाग आपल्या जबाबदाऱ्या झटकत असून, येथील मगरी मात्र नामशेष होण्याची भीती आहे. अशी भीतीसुद्धा पर्यावरण प्रेमी आणि प्राणीमित्र व्यक्त करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!