स्त्रीच्या सामर्थ्याला मान आणि तिच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार’ २०२५ यावर्षी पवईत होणार असून, यासाठी अनेक सिने कलाकारांची उपस्थिती असणार आहे. सिनेतारका वर्ष उसगावकर, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, पूर्णब्रम्हच्या व्यवस्थापकीय संचालिका जयंती कठाळे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.
एकता महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, ब्रांड व्हिजन मार्केटिंग आणि सर्विस मजिक टच इव्हेंट्स यांच्या संयुक्त माध्यमातून होणाऱ्या पवई फूड, आर्ट्स आणि म्युजिक फेस्टिवलचा तो एक भाग असणार आहे. ३, ४, ५ आणि ६ एप्रिल या कालावधीत हा महाउत्सव होणार असून, महाराष्ट्रातील ५१ महिलांना ‘महाराष्ट्र भूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पवई हिरानंदानी येथील जलवायू विहार समोरील दुर्गापूजा मैदानात हा महाउत्सव होणार आहे.
कसा असणार आहे कार्यक्रम ?
राजकारण, सामाजिक सुधारणा, शिक्षण, कला, क्रीडा आणि विज्ञान या विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील ५१ महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शूर पराक्रमी मावळ्यांचा इतिहास आणि देखावा येथे पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील अस्सल खाद्य संस्कृतीचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक पारंपारिक नृत्य परंपरेचे सादरीकरण देखील सांस्कृतिक कार्यक्रमातून येथे होणार आहे.
No comments yet.