ढोल – ताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला…. या जयघोषात मंगळवारी दिड-दिवसाच्या गणरायाला पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर गणेश भक्तांनी विसर्जन करून निरोप दिला.
मुंबईमध्ये गणपती बसवणार्यांमध्ये दिड दिवसाच्या गणपतींचे प्रमाण अधिक असते. यंदाही अनेकांनी नवसपूर्ती व परंपरा पाळत गणरायाची चतुर्थीला प्रतिष्ठापणा केली आहे. मंगळवारी पवई, चांदिवली, साकीनाका, विक्रोळी व आसपासच्या परिसरातील अशा पाच हजाराच्या वर गणराज पहिल्याच दिवशी विसर्जनाला आले असल्याने यावर्षी मोठ्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गणेश विसर्जनाच्या काळात जमा होणाऱ्या जनसमुदायाचा विचार करता राखीव दल, स्वयंसेवक, पवई पोलीस व साकीनाका वाहतूक विभाग यांनी तलाव परिसरात आणि रस्त्यांवर चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक कोंडी होणार नाही आणि अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली होती.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.