[ditty_news_ticker id=”2224″]
हनुमान रोड आयआयटी मार्केट पवई येथे असणाऱ्या मारुती मंदिराला सुद्धा पालिकेने पाडण्याची नोटीस दिली आहे. हे मंदिर कोणालाही अडथळा बनणारे नाही, केवळ कोण्या एका विकासकाच्या फायद्यासाठी आम्ही याला पाडू देणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेना आता याच्या बचावासाठी पुढे आली आहे. स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी गुरुवारी संध्याकाळी मंदिराला भेट देवून मंदिर वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
पवईतील आदी शंकराचार्य मार्ग आणि हनुमान रोड अशा दोन्ही ठिकाणी असणाऱ्या मारुती मंदिरांना अनधिकृत ठरवत लवकरात लवकर हटवण्याची मागणी महानगरपालिकेतर्फे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास पालिका स्वतः त्याच्यावर निष्कषणाची कारवाई करणार असल्याची नोटीस सुद्धा या मंदिरांना देण्यात आलेल्या आहेत. पैकी आदी शंकराचार्य मार्गावर असणारे मारुती मंदिर वाचवण्यासाठी भक्त मंडळींसह स्थानिक भाजप नेत्यांनी सुद्धा यात उडी घेतली आहे. मात्र, हनुमान रोडवरील मंदिर बचावासाठी स्थानिक वगळता कोणीच समोर येत नसल्याने अखेर शिवसेनेने याच्या बचावासाठी पुढाकार घेतला आहे.
काल (गुरुवारी) शिवसेना आमदार सुनील राऊत, शाखाप्रमुख निलेश साळुंखे आणि पवईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हनुमान रोड मारुती मंदिर परिसराला भेट देवून लोकांची मते जाणून घेतली.
‘सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व ठिकाणी ही कारवाई चालू आहे. मात्र या मंदिरामुळे कोणताही अडथळा निर्माण होत नाही आहे, तेव्हा संबंधित विभागाशी चर्चा करून कारवाई रोखण्याचे पुरेपूर प्रयत्न मी करेन” असे आमदार सुनील राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शाखाप्रमुख निलेश साळुंखेने स्थानिक विकासकांचा डाव यावेळी उघडा पाडत ‘कोणी विकासक आपल्या फायद्यासाठी या मंदिराला हटवण्याचा प्रयत्न करत असल्यास शिवसेना ते कधीही होवू देणार नाही” अशी गर्जना करत शिवसेना हे मंदिर वाचवण्यासाठी पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
ask them if the temple is the in between the road and we dont want to hurt emotions of the people better way us repair the road and on the road make one slab where temple will be shifted on top it means road as well as temple both are in same place