व्यावसायिकाला २० लाखाचा गंडा घालणाऱ्या अभियंत्याला दिल्लीतून अटक

र्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कांदिवली येथील एका व्यावसायिकाला २० लाखाचा गंडा घालणाऱ्या यांत्रिकी अभियंत्याला दिल्लीतून पवई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. परवेश कुमार (२३) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याचे इतर दोन साथीदार आकाश आणि पंकज यांचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईतील नामांकित फर्निचर निर्माते गुरु सिंग (बदललेले अडनाव) यांना फर्निचर बनवण्यासाठी चीनमधून लाकूड आयात करण्यासाठी १.५ करोड रुपयांची गरज होती. यासाठी बँकेच्या चकरा मारत असतानाच त्यांच्या एका जवळच्या मित्राने त्यांची आकाश आणि पंकज नामक दोन व्यक्तींशी ओळख करून दिली. कर्ज मिळवण्यासाठी त्या दोघांनी २० लाख रुपयांची संरक्षण ठेव म्हणून गुरु यांच्याकडे मागणी केली. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रूम बुक करून तेथे असणाऱ्या लॉकरमध्ये गुरु यांना ती रक्कम सोडावयास सांगितली. मात्र, गुरु यांना शंका जाणवत असल्याने त्यांनी लॉकरच्या कोडचे पहिले दोन आकडे सांगण्याचा हट्ट ठेवल्याने आकाश आणि पंकज यांनी आपला हा प्लान बासनात गुंडाळला.

“काही दिवसातच यांत्रिकी अभियंता असणाऱ्या परवेश कुमार याची त्यांनी गुरु यांना बँकेचा मध्यस्त असल्याची ओळख करून देत, मंजुरीच्या निमित्त गुरु, आकाश व पंकज पवई येथे आले. येथील एका खाजगी बँकेच्या ब्रांच बाहेर परवेशची गाठभेट घेवून ते आतमध्ये गेले. यावेळी परवेश याने बँकेला पाठवलेल्या एका मेलची प्रत दाखवून गुरु यांचा तो बँकेचा मध्यस्त असल्याची खात्री सुद्धा करून दिली. कर्ज मंजुरीचे काम चालू असून, गुरु यांना आत बसायला सांगून त्यांनी तिथून कार घेवून पळ काढला” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले, “नंतर कार आम्हाला पवई प्लाझा येथे मिळून आली. बँकेतील चौकशीमध्ये प्रवीण याचे दिल्ली येथील त्याच बँकेच्या शाखेत खाते असल्याची माहिती मिळाली. तेथे मिळालेल्या पत्याच्या आधारे त्याला तेथील त्याच्या घरातून आम्ही अटक केली आहे. त्याच्या चौकशीत आकाश याचे खरे नाव नवीन असल्याचेही समोर आले आहे.”

पवई पोलिसांनी भादवि कलम ४२० (फसवणूक) आणि ३४ (गुन्ह्याच्या इराद्याने सामुहिकरित्या केलेले कृत्य) नुसार गुन्हा नोंद केला असून, पंकज आणि नवीन याचा शोध घेत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!