@२१८: पवईत रक्तदान शिबिरात रेकॉर्डब्रेक रक्तदान

@अविनाश हजारे : पवईच्या महात्मा फुले नगर येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला तुफान प्रतिसाद लाभला असून, रक्तदात्यांनी  मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत पवईत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी तब्बल २१८ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.

पवईच्या ऋणी फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम  हाती घेण्यात आला होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला ब्रँडेड एअरपॉड्स गिफ्ट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमाला ए. एन फाउंडेशनचे अशोक गायकवाड व युनिक कंपनीचे उत्तम काटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऋणी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांसह अनिल बनसोडे, सचिनभाऊ भालेराव, विराज भालेराव, नितीन भालेराव, महेंद्र मुळे, मयूर बनसोडे, विकास निंबाळकर, सोनू बनसोडे, अतुल तिवारी, अनिकेत लोखंडे, आदी. पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यास प्रविण खरात, पत्रकार रविराज शिंदे व अमोल पारगावकर यांनी सहयोग केला.

, , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!