@अविनाश हजारे : पवईच्या महात्मा फुले नगर येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला तुफान प्रतिसाद लाभला असून, रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करत पवईत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी तब्बल २१८ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली. पवईच्या ऋणी फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला ब्रँडेड एअरपॉड्स गिफ्ट […]
