पवईकर, लेखक, स्तंभ लेखक विवेक गोविलकर यांच्या ‘गांधी अँड हिज क्रिटीक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर पुण्यात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. हे पुस्तक सुरेश द्वादशीवार यांचे पुरस्कार विजेते मराठी पुस्तक ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकाचा अनुवाद आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्यावतीने गांधी भवन, पुणे येथे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे मंगळवारी (१ ऑक्टोबर) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
या सप्ताहमध्ये महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार, सत्य, अहिंसा आणि शांती यांचे महत्व तसेच योगदानाची आठवण ठेवून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात विवेक गोविलकर यांच्या ‘गांधी अँड हिज क्रिटीक्स’ पुस्तकाचे शरद पवारांच्या हस्ते प्रकाशनाने झाली.
No comments yet.