१७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० तिरंदाज शाळेत मोहीम
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची, दुरुस्ती करण्याची व ठिकाणाच्या बदलाच्या नोंदणीची सुवर्णसंधी पवईमधील जनतेस चालून आली आहे. आय आय टी येथील तिरंदाज शाळेत यासाठी मतदार नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.
स्थानिक नगरसेवक चंदन चित्तरंजन शर्मा यांच्यावतीने तिरंदाज मनपा शाळेत १७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०१६ या काळात सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० यावेळेत ही मोहीम राबवली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे:
रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, जन्माचा दाखला, शाळेचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र / दाखला, वीज / दूरध्वनी / गॅस जोडणी बिल
झेरॉक्स प्रती या विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) किंवा नगरसेवक यांनी प्रमाणित (स्वाक्षरी) केलेल्या असणे आवश्यक आहे.
अर्जाचे प्रकार:
नमुना ६: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी
नमुना ८: मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी
नमुना ८ (अ): मतदार यादीतील नाव त्याच मतदार संघातील अन्य ठिकाणी नोंदणी करावयाचा अर्ज
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.