पवईत ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ उत्साहात साजरा

wwdआंतरराष्ट्रीय संस्था तफिसातर्फे जगभर संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ या जागतिक उपक्रमाचा एक भाग म्हणून  ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑल’च्या वतीने रविवारी हेरिटेज गार्डन हिरानंदानी येथे ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ आणि ‘टेक युवर स्ट्रीट बॅक’चे आयोजन केले गेले होते. यावेळी जगदगुरु सुर्याचार्य कृष्णानंद देवनंदगिरी (मथुरापीठ), अवधूतानंद सरस्वती शंकराचार्य, सुधीर शर्मा (आयआरएस अधिकारी), अप्पासाहेब चिंचकर, विजय तांदळे, दिनेश राजभर, ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑलचे पदाधिकारी, स्पोर्ट्स आणि फिटनेस क्षेत्रातील मान्यवरांसोबत ६५० लोकांनी यात सहभाग नोंदवला होता.

दैनंदिन जीवनात आपले आरोग्य उत्तम राखण्यास चालणे हा व्यायाम अत्यावश्यक आहे, याचे महत्व जगभर पटवून देण्यासाठी तफिसा या संस्थेने १९९१ पासून ऑक्टोबर महिना हा ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. आज २५ वर्षानंतर मोठ्या संख्येने लोक जगभर रस्त्यावर उतरून या उपक्रमात सहभाग घेत असून, गेल्या वर्षी १.२० करोड लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. नेहमीप्रमाणे पवई मध्ये सुद्धा ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑलने उपक्रमाचे आयोजन केले होते.

या वेळी बोलताना ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्टस ॲड फिटनेस फॉर ऑलचे सचिव रमेश जाधव म्हणाले, “यांत्रिक युगात चालण्याऱ्यांची संख्या अल्प असली तरी १५ मिनिटाचे चालणे सुद्धा आठवड्याभराच्या फिटनेससाठी पुरेसे असते. हीच गोष्ट लोकांना पटवून देण्यासाठी आणि लोकांना  चालण्याच्या सवयी लावण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी या उपक्रमाचे आयोजन करतो.”

ते पुढे म्हणाले, “चालण्याची लोकांच्यात आवड असली तरी बराच वेळ चालण्यासाठी बनवलेल्या फुटपाथ, रस्त्यावर अतिक्रमण करत दुकाने उभारली गेली आहेत त्यामुळे लोकांना चालण्यासाठी जागाच उरली  नाही. म्हणून आम्ही यावेळी ‘वर्ल्ड वॉकिंग डे’ सोबत ‘टेक युवर स्ट्रीट बॅक’ हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. यातून मुंबईतील अनेक रस्ते आम्ही चालण्यासाठी अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!