सोशल नेटवर्क साईटवर मैत्री करून महिलेला दोन लाखाचा गंडा

online-scamवईतील एका ३४ वर्षीय महिलेशी सोशल नेटवर्किग साईटवर मैत्री करून, भेटवस्तू पाठवण्याच्या बहाण्याने १.७३ लाखाचा गंडा घातल्याचे नुकतेच समोर आले आहे. याबाबत पवई पोलिसांनी भादवि आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

गिता पारेख (बदललेले नाव) या पवईतील अशोकनगर भागात आपल्या दोन मुलींसोबत राहतात. त्यांचे पती मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असल्यामुळे बराच काळ घराबाहेर असतात. फावल्या वेळेत आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत गप्पा मारता याव्यात म्हणून गिता यांनी सोशल नेटवर्कवर आपले अकाऊंट तयार केले होते.

ऑगस्ट महिन्यात त्यांची याच साईटवर बायन इलीयन्स व्ही व्ही एन या इसमाशी ओळख झाली. पुढे त्याचे रुपांतर घनिष्ट मैत्रीत झाले. बायन याने तो लंडनला राहत असून, मैत्रीची निशाणी म्हणून त्यांना गिफ्ट पाठवत आहे असे सांगून लापतोप, कॅमेरा, म्युजिक सिस्टम अशी महागड्या सामानाची एक लिस्ट पाठवली असे गिता यांनी  पोलिसांना दिलेल्या जवाबात नमूद केले आहे.

काही दिवसातच त्यांना प्रथम क्लीरन्ससाठी ३९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आणखी काही दिवसाने अनिता शर्मा नामक एका स्त्रीने त्यांना फोन करून तुमचे सामान कस्टममध्ये अडकले आहे, ते सोडवण्यासाठी आणखी रकमेची मागणी केली. पैसे न भरल्यास आणि आतंकवादी कारवाईसाठी असेच छुप्या मार्गाने सामान येण्याची शक्यता आहे, तेव्हा त्वरित सोडवून तपासणी करून घ्या किंवा तुम्हाला अटक होऊ शकते असे घाबरवले. गिता यांनी ती रक्कम सुद्धा त्या महिलेने दिलेल्या अकाऊंट नंबर ३५७७२३६६३९८ वर भरली.

“बरेच दिवस होवूनही सामान मिळत नसल्याने व बायन इलीयन्स आणि अनिता शर्मा या दोघांचाही काहीच संपर्क होत नसल्याने, आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली आहे” असे याबाबत आवर्तन पवईशी बोलताना पोलीस उप-निरीक्षक रावसाहेब मोटे यांनी सांगितले.

“आम्ही भादवि कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे” असे आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले.

पवई पोलिसांच्या हद्दीत घडलेली हि प्रथम घटना नसून, गेल्या एक महिन्याच्या कालावधीतील हि चौथी घटना आहे. जे पाहता पवई पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्कतेचे इशारे देत अशा भूलथापांना बळी न-पडण्याचे आवाहन केले आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!