पवई तलावाचे पर्यटन महत्व लक्षात घेऊन आमदार निधीतून नुकतेच “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्मिती येथे करण्यात आली आहे. स्थानिक आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्या निधीतून याची निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे रविवारी पवईतील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या आमदारासोबत सेल्फी घेत उद्घाटन केले.
यावेळी सुट्टीचा दिवस असतानाही आणि भर पावसात मोठ्या प्रमाणात पवईतील विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक, नागरिक यावेळी उपस्थित होते.
२२० हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेला पवई तलाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. विशेषतः शनिवार व रविवारी पर्यटनस्थळांकडे धाव घेणाऱ्या मुंबईकरांसाठी हे हक्काचे ठिकाण आहे. पाठीमागील काही वर्षात या भागात झालेल्या सौंदर्यकरणामुळे तलावाला अनेक मुंबईकर, पर्यटक भेट देत असतात. तलाव परिसरात फोटो घेतात. तलावात मोठ्या प्रमाणात मगरीचे साम्राज्य आहे. अशावेळी तलावाच्या किनाऱ्यावर उतरत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांच्या असणाऱ्या जीवाच्या धोक्याला पाहता येथे एक सेल्फी पॉईंट निर्मितीचा विचार स्थानिक आमदार नसीम खान यांच्या मनात आला होता.
या विचारला सत्यात उतरवत आमदार निधीतून म्हाडातर्फे पवई तलावावर “माय इंडिया” सेल्फी पॉईंटची निर्माण करण्यात आले आहे.
सेल्फी घेणे हा प्रकार आता एवढा पसरला आहे कि सेल्फीसाठी धोकादायक जागी उभे राहून, धोकादायक स्टंट करून सेल्फी घेताना तरुणांना जीव गमवावे लागल्याच्या घटना दररोज घडत असतात. यामुळे जागोजागी पर्यटन स्थळी सेल्फी निर्माण केल्याने पर्यटनात देखील भर होते व संभाव्य होणारा धोका काही प्रमाणात टाळता येतो.
पवई तलाव हा मुंबईतील पर्यटकांमधील प्रसिद्ध तलाव आहे. या तलावावर मोठ्या प्रमाणात युवक-युवती फिरण्यासाठी येत असतात. नागरिक व पर्यटक या तलावावर येऊन निसर्गसंपन्न अशा वातावरणात काही वेळ घालवतात. निसर्गसौंदर्यासह परिसरात असणाऱ्या इमारती, पंचतारांकित हॉटेल, आयआयटी कॅम्पस अशा गोष्टींसोबत सेल्फी घेण्याचा मोह पर्यटक कसा टाळू शकतील. म्हणूनच लोकांना सुरक्षित आणि हक्काचे सेल्फी पॉईंट असावे म्हणून आम्ही या सेल्फी पॉईंटचे निर्माण केले आहे, असे याबाबत बोलताना आमदार आरिफ (नसीम) खान यांनी सांगितले.
No comments yet.