मारुती मंदिर वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम

मारुती मंदिर बचाव मोहिमेअंतर्गत मंदिर वाचवण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी आज (११ एप्रिल २०१७) मारुती मंदिर परिसरात हनुमान जयंती आणि सह्यांची मोहीम असा दुहेरी उपक्रम राबवला जात आहे.

आयआयटी येथील मारुती मंदिराला पालिका ‘एस’ विभागाने निष्कासनाची नोटीस बजावल्यानंतर आता हे मंदिर केवळ एका व्यक्तीच्या मालकीचे नसून आम्हा सर्वांचे आहे म्हणत भक्तमंडळी मैदानात उतरली आहेत. मारुती मंदिर बचाव मोहिमेअंतर्गत मंदिर वाचवण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव बनवण्यासाठी आज (११ एप्रिल २०१७) मारुती मंदिर परिसरात हनुमान जयंती आणि सह्यांची मोहीम असा दुहेरी उपक्रम राबवला जात आहे.

मुंबईतील अवैध धार्मिक स्थळांना बजावलेल्या नोटीसीच्या विरोधात काल (सोमवारी) सर्वच नगरसेवकांनी ‘वोल्क आउट’ केल्याने व भाजप नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांनी मारुती मंदिराचा प्रश्न सभागृहात उपस्थित केल्याने या मोहिमेला अजून बळकटी मिळाली आहे.

२००९ आणि २०११ अशा दोन्ही वेळी हे मंदिर हटवण्यासाठी आलेल्या प्रशासनाला मोठ्या जनसमुदायाच्या विरोधाचा सामना करावा लागून हात हलवत परत जावे लागले होते. यावेळीही तेच होणार – पवईकर भक्तजन

यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र गप्प राहण्याचा पवित्रा घेतला आहे. प्रत्यक्षात सात दिवसानंतर ते याबाबत काय पाऊले उचलतात यावरच त्यांच्या या गप्प राहण्यामागचे कारण स्पष्ट होईल.

१९२५ साली विश्वस्थ श्रीधर परांजपे यांचे वडील नारायण परांजपे यांना पवई तलावाच्या कामाच्या वेळी पद्मावती देवी मंदिराच्या बाजूच्या परिसरात एक तीन फुट उंचीची मारुतीची मूर्ती मिळून आली होती. जी मूर्ती त्यांनी आता मंदिर असणाऱ्या ठिकाणी एका झाडाखाली आणून स्थापित केली. हळू हळू हे भक्तांचे श्रद्धास्थान बनत गेले आणि पुढे तिथे मंदिराचे निर्माण करण्यात आले.

गेल्या आठवड्यात आदि शंकराचार्य मार्गावर (जोगेश्वरी –विक्रोळी लिंक) असणाऱ्या या मारुती (हनुमान) मंदिराला ‘पिटीशन फॉर लिव्ह टू सिव्हील’च्या सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा व महाराष्ट्र शासनाचा अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या आदेशाचा हवाला देत पालिकेच्या एस विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालयातून मंदिर प्रशासनाला सात दिवसाच्या आत हनुमान मंदिर काढण्यात यावे, अन्यथा सदर मंदिरावर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे पवईमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर भक्त मंडळांकडून मंदिर हटवण्यास पूर्ण विरोध होत असून, याला वाचवण्यासाठी शनिवारी पवईकरांची मुक्तेश्वर आश्रम येथे मिटिंग आयोजित केली होती.

यावेळी घेतलेल्या निर्णयानुसार प्रशासनाला आपला विरोध दर्शवण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यानंतरही जर प्रशासनाने कारवाईचे आदेश मागे घेतले नाही तर या मंदिराची जागा ही एका व्यक्तीच्या मालकीची असली तरी मंदिर सर्व जनतेचे आहे त्यामुळे मंदिर वाचवण्यासाठी सर्व जनतेने रस्त्यावर उतरून याचा विरोध करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

, , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to मारुती मंदिर वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम

  1. Purnachandran Nair April 16, 2017 at 3:53 am #

    There are certain things that becomes one of the identities of a certain place and it should be preserved especially when sentiments of many (majority) of earlier residents of Powaiites are attached with it. Newer residents or outside administrators may find it absurd and sore thumb but once they delve a bit deeper into the humble origins and existence of this Hanuman temple they could relate to why this temple garners such strong attachment and why it has got nothing to do with any particular religion or religious grandstanding or blocking any supersonic developments around it. Just as it is now illegal to cut the historic tree from the centre of that road, why should a humble idol installed besides it be any different (that stood the test of time instilling a sense of faith and protection to literally millions of residents and JVLR travellers alike). Need of the hour is a proactive step by BMC to find an innovative, economical and a work around solution for this SYMBOL of faith along with Tree in such a way that it eases the commuters of JVLR as well as continue to provide a way for people to seek the blessings, bliss and tranquility amidst the rush and noise of ever bustling city around it. Just as it had always been for years.

    • VK Singh Yadav December 11, 2017 at 6:07 pm #

      New deadline for demolition of Maruti Mandir Powai is 15th Dec 2017. It’s shame on people who manipulated overall things for their own benifits. The earlier concern of traffic issue has vanished long back.. What a game!!! They even fooled High Court?

Trackbacks/Pingbacks

  1. The real reason to move the Maruti Mandir is not the Traffic problems, here is the real reason . - POWAI INFO - September 16, 2017

    […] Comment from AvartanPowai.info […]

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!