भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात इसमांनी हल्ला करत तोडफोड केली. यानंतर त्यांच्या अनुयायांकडून मोठा राग व्यक्त केला जात आहे. मात्र आंबेडकर परिवाराने अनुयायांना शांत राहण्याची विनंती केल्यानंतर पवई परिसरातील अनुयायांतर्फे आरोपींना त्वरित अटक करून, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि राजगृह तसेच आंबेडकर परिवाराला सक्षम सुरक्षा प्रदान करण्याची […]
Tag Archives | चांदिवलीची आजची बातमी
पवईत दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद
कोरोना बाधितांच्या संख्येने मुंबई महानगरपालिका एस विभागात उच्चांक गाठला असतानाच पवईकरांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी आहे. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पवई परिसरात ३० जून आणि १ जुलै या दोन दिवसात ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात ३० जून रोजी एक तर १ जुलै रोजी ३ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या […]
मेडिकल स्टोअर मालकाची ऑनलाईन फसवणूक
पवई येथील मेडिकल आणि जनरल स्टोअरच्या मालकाची ₹ २०,०००ची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी आपली ओळख सैन्य अधिकारी म्हणून करून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात नागरिकांना आवश्यकता असणाऱ्या मेडिकल किटची गरज लक्षात घेता, आरोपीने हँड सॅनिटायझर, मास्क आणि हँड ग्लोव्हज ऑर्डर करून त्याचे पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोड पाठवत मेडिकल मालकाची ऑनलाईन […]
एस विभागात कोरोना जनजागृतीसाठी साक्षात विठू – रखुमाईंची नागरिकांना साद
अवि हजारे: एस विभागात नागरिकांना कोरोना चे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी पालिकेने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर सुद्धा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी साक्षात विठ्ठल- रखुमाई नागरिकांच्या दारोदारी जावून जनजागृती करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनेकमार्गे मार्गदर्शन आणि रोखून देखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोना चा एस विभागात वाढता आकडा लक्षात घेता, लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगण्यासाठी […]
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एस विभाग प्रयत्नशील
नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग) अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर […]
पवईत व्यावसायिकाची कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या
पवईतील जलवायू विहारच्या पाठीमागील जैन मंदिर रोडवर शुक्रवार २६, जूनला सकाळी एका कारमध्ये ४१ वर्षीय व्यवसायिकाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. नैराश्यातून त्याने कारमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अधिक तपास सुरु आहे. या संदर्भात पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुख्य नियंत्रण कक्षाकडून एसएम शेट्टी शाळेजवळील म्हाडा इमारत क्रमांक […]
गांधीनगरजवळ भरधाव कार पलटली, दोन जण जखमी
पवईकडून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी भरधाव मोटार कार गांधीनगर पुलाजवळ पलटली. बुधवार, २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह एक महिला सुद्धा जखमी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०३ बीएस ८४२८ डस्टर कार जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवरून (जेविएलआर) मुलुंडच्या दिशेने चालली होती. “भरधाव वेगात जाणारी ही कार […]
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पवईत सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण
कोरोना व्हायरसच्या उद्रेक दरम्यान पवईतील विविध भागात सॅनिटायझेशन ट्रॅक्टरच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात आले. स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील आणि नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांच्या प्रयत्नाने शनिवारी पवईत ही फवारणी करण्यात आली. शनिवारी एकाच दिवसात देशात १४,५१६ नवीन कोविड-१९ प्रकरणांची नोंद झाली. ज्यामुळे शनिवारी बाधितांची संख्या ३,९५,०४८ वर पोहचली होती. ज्यापैकी २.१ लाख रूग्ण बरे झाले आहेत. […]
पवईत कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला
पालिका एस विभागांतर्गत येणाऱ्या पवई परिसरात कोरोना बाधित मिळण्याचा वेग मंदावला असून, सोमवार २२ जून रोजी पवईमध्ये ३ बाधितांची नोंद झाली आहे. पवई परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत मिळालेल्या बाधितांचा आकडा पाहता पवई परिसरात बाधित मिळण्याचा वेग मंदावला असल्याचे समोर येत आहे. कोरोना विषाणूंनी मुंबईवर आपली पकड घट्ट केली असून, पालिका ‘एस’ विभाग कोविड-१९च्या यादीत […]