उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटत आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवईमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महिला, सामाजिक – राजकीय संघटना आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित येत निषेध व्यक्त करत उत्तरप्रदेश सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. अजून किती निर्भया? असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. एकीकडे देशभरात कोरोना […]
Tag Archives | आंदोलन
मराठा आरक्षणासाठी पवईत आंदोलन
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पवईसह मुंबईत विविध ठिकाणी रविवारी आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे मराठा समाजाने रस्त्यावर उतरत आंदोलने केली. पवईतील आयआयटी मेनगेट समोर मराठा समाजांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, जोपर्यंत स्थगिती उठविली जात […]
संघर्षनगरकरांचा संघर्ष संपणार, नागरी सुविधांसाठी पालिकेकडून ८० कोटीची मंजूरी?
पाठीमागील १२ वर्षापासून नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या चांदिवली येथील संघर्षनगरकरांना आता दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. मंगळवारी स्थानिक नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी, मुंबई महापौर आणि पालिका आयुक्त यांच्यात झालेल्या संयुक्त चर्चेत या परिसरातील नागरी सुविधांसाठी पालिकेतर्फे ८० कोटीचा फंड मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे […]
बिल्डर आणि खाजगी ट्रस्टच्या मालकी वादात बळी पडलेल्या रहेजा विहारकरांचे अधिकारासाठी रविवारी निषेध आंदोलन
बिल्डर आणि एका खाजगी ट्रस्टच्या मालकी हक्काच्या वादात रहेजा विहारमधील घर मालकांना आपल्या घराचे कोणतेही कायदेशीर व्यवहार करण्यास आलेल्या बंदीच्या नोटीसी विरोधात रविवार, ३० जूनला येथील स्थानिकांकडून निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रहेजा विहार येथील पालिका इन्स्टिट्यूटच्या जवळ बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या मोकळ्या जागेत सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. पवई, चांदिवलीच्या […]
आयआयटी मुंबईच्या पीएचडी विद्यार्थ्यांचे कॅम्पस गेटबाहेर आंदोलन
विद्यार्थी कॅम्पस बाहेर आंदोलन करताना रविराज शिंदे आयआय मुंबईतील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने शुक्रवारी (२१ डिसेंबर) प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत कॅम्पसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे आयआयटीत निषेध रँली सुद्धा काढण्यात आली. यावेळी विविध विषयांवर पीएचडी करणारे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. आपल्या प्रमुख मागण्यासहित अस्तित्व टिकवण्यासाठी, जगण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी […]
संघर्षनगरच्या रस्त्यावरून भाजपा आक्रमक; विकासकाच्या कार्यालयावर हल्लाबोल
चांदिवली संघर्षनगर भागात विकासक, पालिका, स्थानिक प्रतिनिधी सर्वांनीच दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही येथील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच परिणाम जाणवत नसल्यामुळे शुक्रवारी स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासक सुमेर कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धरणे दिले. बोरीवली राष्ट्रीय उद्यान आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या राहणाऱ्या हजारो परिवारांना दहा वर्षापूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजने […]
रोड नुतनीकरणात होणाऱ्या दिरंगाई विरोधात शिवसेनेचे रांगोळी आंदोलन
पालिका रस्ते विभागाकडून आयआयटी, पवई येथील प्रशांत अपार्टमेंट रोडवर गेल्या दोन महिण्यापासून सिमेंटकॉक्रीट रोड निर्मितीचे काम सुरु आहे. रोड निर्मितीच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे लोकांना त्रास होत असल्याकारणाने शिवसेनेने आज रोडवर उतरत खोदकाम केलेल्या रस्त्यावर रांगोळी काढून आंदोलन केले. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडीओ लिंकवर क्लिक करा.
आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन
पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]
युथ पॉवरच्या छत्री वाटप आंदोलनाला ‘बेस्ट’ यश; बस थांब्यावर बसवले छप्पर
रविराज शिंदे पवईमधील आयआयटी येथील सर्वच बस थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना पावसाळ्या सोबतच उन्हातान्हात सुद्धा त्रास सहन करत बस येईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. या बस थांब्यावर छप्पर उभारण्यात यावेत यासाठी, ‘युथ पॉवर’ संघटनेच्यावतीने बेस्ट प्रशासनाला कानपिचक्या काढत प्रवाशांना छत्री वाटप करून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची बेस्ट प्रशासनाने दखल घेत अखेर पवईतील […]
वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम
आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]
रहेजा विहारच्या घरकाम करणाऱ्या महिलांचे कामबंद आंदोलन तात्पुरते मागे
चांदिवली, रहेजा विहार येथील रहेजा विस्टा सोसायटीने घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नवीन दरपत्रक काढत सरसकट सर्वांना एकाच पारड्यात तोलण्याच्या घातलेल्या घाटाच्या विरोधात येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. ज्याबाबत काल मनसे विभाग अध्यक्ष अशोक माटेकर यांनी दोन्ही पक्षांना समजावत आंदोलन पाठीमागे घेतले आहे. आंदोलन मागे घेतले असले तरी योग्य मोबदला नाही दिला गेल्यास पुन्हा […]