Tag Archives | आयआयटी

प्रातिनिधिक छायाचित्र

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या मास्टरमाईंडला बँगलोरमधून अटक

मेडिकल कॉलेजेसना ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा घालणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्यासह साथीदाराला पवई पोलिसांनी बँगलोर येथून अटक केली आहे. श्याम हरिप्रसाद यादव उर्फ आर के सिंह (३६) राहणार ओशिवरा आणि त्याचा साथीदार आनंद चांगदेव आघाव (३२) राहणार पंचकुटीर,पवई अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अभिषेक सिंग याचा पोलीस शोध घेत असून, ऑगस्ट महिन्यात […]

Continue Reading 0
powai-thief-broken-car-windows-and-stolen-cash-and-valuables

पवईत चोरट्यांचा सुळसुळाट; गाड्यांच्या काचा फोडून ५ लाखांची चोरी

आयआयटी पवई येथील मॅरेथॉनवेळी १२ गाड्या फोडून चोरीच्या घडलेल्या गुन्ह्याचे काहीच धागेदोरे हाती लागले नसतानाच, पवईत पुन्हा गाडीच्या काचा फोडून ५ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या चोरीचा गुन्हा घडला आहे. हिरानंदानीतील वेरोना फ़ाऊंटन येथे दोन तर नोरिटा बस स्टॉप येथे हे गुन्हे घडले आहेत. परिसरात मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पवई पोलिसांनी चोरांचा शोध सुरु केला आहे. पाठीमागील महिन्यात […]

Continue Reading 0
hatya

दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा दगडाने ठेचून खून, आरोपीला अटक

दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या […]

Continue Reading 0
water issue powai

ऐन गणेशोत्सवात पवईकरांचे पाणी पळवले; रविवारी विजेचे झटके

@रविराज शिंदे, रमेश कांबळे गुरुवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळे सगळीकडे त्याची लगबग असतानाच पवईमधील जुनी पवई मानल्या जाणाऱ्या आयआयटी भागातील अनेक परिसरात शनिवारी आणि रविवारी पालिकेने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाणी गुल केले. ही समस्या कमी होती की काय, रविवारी परिसरातील वीज सुद्धा गायब झाली. ऐन गणेशोत्सवात शनिवार – रविवारची सुट्टी गाठून आखलेल्या पवईकरांच्या […]

Continue Reading 0
IMG_4058

दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

@रमेश कांबळे, प्रमोद चव्हाण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा गर्जनेत, ढोल-ताशे, बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे शुक्रवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. गुरुवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसाचा […]

Continue Reading 2
car

चोरट्यांनी आयआयटी पवईत हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या १२ लोकांच्या गाड्या फोडल्या

पवईतील आयआयटी येथे हाफ मॅरेथॉनसाठी आलेल्या धावपटूंच्या जवळपास १२ वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आज सकाळी पवईत घडली आहे. यावेळी चोरट्यांनी गाडीतील लॅपटॉप, मोबाईल, बॅग अशा मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. पवईतील आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये आज (रविवारी) सकाळी हाफ मॅरेथॉन […]

Continue Reading 0
56th Convocation of IIT Bombay 1 (2)

स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!